त्र्यंबक तालुक्यात खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

त्र्यंबक तालुक्यात खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
खते

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

तालुक्यात भात पेरण्या (Rice Cultivation) अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांची खते खरेदीची लगबग सुरु झाली आहे.

त्र्यंबक तालुक्यात भात महत्वाचे पिक असून यंदा पेरण्या वेळेवर सुरु झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून लवकरच भात लावणीच्या कामांना वेग येणार आहे. तत्पूर्वी खत खरेदीची (Fertilizers Price) लगबग तालुक्यात दिसत आहे. अलीकडेच खतांच्या किमती आहे त्याच दरात मिळतील अशा सूचना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी खते खरेदी करण्यास प्रारंभ केला.

अवकाळी पाऊस जोरदारपणे पडल्याने यंदा खरीप हंगामातील पेरण्यांनी मे महिन्याच्या शेवटालाच बियाणे पेरण्याची सुरवात केली आहे. सध्या या पिकांना पावसाची आवश्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भात लावणीला पुरेशा पावसाची गरज असल्याने शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तर शेतकऱ्यांनी खते खरेदी करतांना भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पॉकिट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.