कृषि यांत्रिकीकरण योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - वाघ

कृषी यांत्रिकीकरण
कृषी यांत्रिकीकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खरीप हंगाम (Kharif Season) २०२२ साठी शेतकऱ्यांना (Farmers) शेतीच्या कामांसाठी उपयोगी असलेले विविध यंत्रे, औजारे या घटकांचे अनुदान महा-डीबीटीद्वारे (Maha-DBT) कृषि यांत्रिकीकरण योजने (Agricultural Mechanization Scheme) अंतर्गेत देण्यात येते.

या कृषि यांत्रिकीकरण योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक (Divisional Agriculture Joint Director) मोहन वाघ (Mohan Wagh) यांनी केले आहे.

कृषी विभागाने 'महाडीबीटी' पोर्टलवर 'शेतकरी योजना' (Farmer Scheme) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता कृषि यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत कषि यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत 'महाडीबीटी' पोर्टल ही एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे.

या योजनेअंतर्गेत शेतीच्या कामांसाठी उपयोगी असलेले विविध यंत्रे, औजारे या घटकांच्या अनुदानाबरोबरच इतरही यंत्रे, औजारे शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना मागील ६ महिन्याच्या आतील जमिनीचा ७/१२, ८ अ, बँक पासबुक सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत स्वत:च्या मोबाईलवरुन महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

दरम्यान, अधिक माहिती mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावी, असेही वाघ यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com