बैलपोळयाच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्याची आत्महत्या

बैलपोळयाच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्याची आत्महत्या

सटाणा | प्रतिनिधी

बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील तरुण शेतकरी प्रकाश केशवराव ठाकरे (वय ४५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली....

ठाकरे यांनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे पाच एकर शेतजमीन होती. ठाकरे यांनी श्रीपूरवडे सोसायटीकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. भाव वाढेल या आशेवर कांद्याची साठवण देखील त्यांनी केली होती. परंतु, आर्थिक गणित कोलमडल्याने तणावात असलेल्या ठाकरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.

बागलाण तहसीलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील राजपुरपांडे येथील नुकतीच झालेल्या शेतकरी आत्महत्येनंतर श्रीपूरवडे येथील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com