गिरणारे येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

गिरणारे येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सातपूर | Satpur

गिरणारे गावातील (Girnare Village) साहेबराव उर्फ उध्दव आशोक बत्तासे (वय 35) याने बुधवारी शेतीच्या कर्जाला (Farming Loan) कंटाळुन शेतात विष प्राशन करुन आत्महत्या (Farmers Suicide) केली.

चार वर्षापुर्वी गिरणारे येथील बॅकेकडून सहा लाख रुपये शेती साठी कर्ज घेतलेले होते. परंतु चार वर्षात मेहनत घेऊनही ऊत्पन्न (Income) न झाल्यामुळे तो बॅकेचा एकही हप्ता (bank Loan EMI)भरु शकला नाही.

त्यामुळे त्याने वैफल्यावस्थेत आत्महत्या केली असल्याचा दावा नागरीक करीत आहेत. साहेबराव यांचे वडिल लहानपणीच वारलेले आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, आई , पत्नी आणि दोन लहान मुली असा परीवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com