शेतकर्‍यांनी सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा : भुसे

ठिबक सिंचन अनुदानासाठी निधी मंजूर
शेतकर्‍यांनी सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा : भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राज्यातील सूक्ष्म सिंचन संच (Micro Irrigation Set) बसविणार्‍या शेतकर्‍यांना (farmer) पूरक अनुदान (Grants) देण्याकरिता 200 कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भात 6 जानेवारीरोजी शासन आदेश काढण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिली.

राज्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana) ठिबक (Drip) व तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) संचाकरिता अनुदान देण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना खर्च मर्यादेच्या 55 टक्के व इतर शेतकर्‍यांना खर्च मर्यादेच्या 45 टक्के अनुदान 5 हेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्र शासन (central government) 7 टक्के व राज्य शासन 40 टक्के या प्रमाणात निधी (fund) उपलब्ध करुन देते.

राज्य शासनाने दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत (CM Sustainable Irrigation Schemes) सूक्ष्म सिंचन संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला. त्यानुसार प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना मिळणार्‍या 25 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकर्‍यांना मिळणार्‍या 25 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना एकूण 75 व 80 टक्के अनुदान मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. अधिकाधिक क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली यावे या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

या निधीतून सन 2021-22 या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकर्‍यांना पूरक अनुदानाचे वितरण (Distribution of grants) करण्यात येणार आहे. 75 टक्के व 80 टक्के अनुदानाचा लाभ झाल्यामुळे शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणार्‍या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होईल. जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री भुसे यांनी शेवटी केले आहे

Related Stories

No stories found.