शेतकर्‍यांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना -अध्यक्ष भारत दिघोळे
शेतकर्‍यांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे

करंजीखुर्द । वार्ताहर Karanjikhurd

बांगलादेशमध्ये लॉकडाऊन असूनही भारतातून कांद्याची निर्यात ( Onion Export to Bangladesh ) तेथे सुरूच आहे. पाकिस्तानच्या कांद्याची भारतीय कांद्यासोबत स्पर्धा आहे. मात्र भारतीय कांद्याच्या उत्कृष्ट चवीमुळे निर्यातदारांनी व्यवहारातील विश्वासार्हता बांगलादेश, श्रीलंका, दुबईसह अन्य देशातील आयातदारांना परवडणारी आहे.

बांगलादेशमध्ये रस्ता वाहतुकीने भारतीय कांदा तत्काळ पोहोचण्याची हमी तसेच श्रीलंकेमध्ये पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा भारतीय कांदा लवकर पोहोचत असल्याने तेथेदेखील या कांद्याला मागणी असल्याचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.

भारतीय कांद्याला जगाच्या पाठीवर सर्वात मोठी बाजारपेठ ही आपला स्वतःचाच देश असून देशामध्ये एकूण कांदा उत्पादनाच्या 80 ते 85 टक्के कांदा भारतामध्येच दरवर्षी लागतो आणि एकूण कांदा उत्पादनाच्या 9 ते 18 टक्के कांदा हा निर्यात होतो. आपल्या देशात आपल्या कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांदा उत्पादकांनी घाबरून न जाता संपूर्ण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये आपल्याकडे साठवलेल्या कांद्याच्या विक्रीचे नियोजन करावे.

चाळीत साठवलेल्या कांद्याची टिकवण क्षमता बघून थोडाफार खराब होण्याची शक्यता असलेला कांदा विक्री करावा व उत्कृष्ट टिकाऊ कांदा पुढील चार महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करावा. कांद्यासंदर्भात सोशल मीडियातून व दैनिकांत येणार्‍या माहितीच्या आधारावर कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. त्यामुळे शेतकर्‍यांकडून जागेवर कांदा खरेदी करणारे किंवा बाजार समितीमध्ये व्यापारी कमी भावात कांदा खरेदी करून शेतकर्‍यांचे नुकसान करतात. त्यामुळे कांदा उत्पादकांनी अशा अफवांना बळी न पडता टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावा, असे आवाहनही दिघोळे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com