द्राक्ष क्लस्टर डेव्हलपमेंन्ट योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

खा.गोडसे यांचे आवाहन
द्राक्ष क्लस्टर डेव्हलपमेंन्ट योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

देवळाली कॅम्प | Deolali Camp

केंद्राच्या नॅशनल व्हर्टिकल बोर्डने उपलब्ध करुन दिलेली द्राक्ष क्लस्टर डेव्हलपमेंन्ट योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी असून नाशिक जिल्ह्यासाठी ती वरदान ठरणारी आहे.

त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादकानी लाभ घेण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर द्राक्ष उत्पादन होत असताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे, शासनाकडून मिळणाऱ्या सुविधां तुटपुंज्या आहेत, त्यामुळे द्राक्ष उत्पादक सतत चिंतेत असतो, यातून मार्ग काढणे व नाशिक येथे द्राक्ष क्लस्टर व्हावे, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्राकडे केलेला पाठपुरावा कामी आला आहे.

केंद्राने देशात ५३ द्राक्ष क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेत पायलट प्रोजेक्ट मध्ये नाशिकचा समावेश केला आहे. काल या योजनेचे नाशिक कृषि विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सादरीकरण करण्यात आले. यावेळी खा. गोडसे बोलत होते, यावेळी कृषि विभागाचे संजय पडवळ, अशोक गायकवाडे, जगन्नाथ खापरे, माणिकराव पाटील, संजय पाटील, सुनिल वानखेडे, डॉ. राजपूत, डॉ. बडगुजर, नॅशनल व्हर्टिकल बोर्डचे हुशारसिंग, प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, हेमंत काळे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक बागायतदार आणि शेतकरी गटांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रॅड थॉटर कंपनीचे व्यवस्थापक झानीयल यांनी ऑनलाईन सादरीकरण करतांना द्राक्षांचे देशांतर्गत व परदेशात असलेले महत्त्व,तसेच उत्पादनात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करणे साठीच्या उपाययोजनाची माहिती दिली. देशात द्राक्ष उत्पादनात नाशिकचा अव्वल क्रमांक असून या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.

तसेच मालाचा दर्जा सुधारण्या बरोबरच उत्पादन ते मार्केटपर्यंन्तच्या समस्या सोडविताना मदत होणार आहे. यावेळी तान्हाजी गायकर, अनिल ढिकले, दत्तुदादा ढगे, मनोज जाधव, आर. के. शिरसाठ, हेमंत काळे, गोकुळ वाघ, एस. पी. सूर्यवंशी, पी. के. खैरनार, डी. पी. गंभीरे, मंगेश भास्कर, पंकज नाठे, अरुण मोरे, नितीन पाटील, भुषण निकम, प्रदीप भुसारे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडल्या सूचना

अत्याधुनिक रोपांची निर्मिती व्हव्ही, रोपे देण्या पूर्वी पाणी व जमिनीची पोत तपासावी, मान्यताप्राप्त अत्याधुनिक नर्सरी केंद्र उभारावेत, पिकावर रोगाचा प्रादूर्भाव होणार नाही, अशा रोपांची निर्मिती करावी, विविध रोग व समस्या या पासून द्राक्ष बागांचे संरक्षण होणे कामी उपाययोजनाचा क्लस्टरमध्ये समावेश असावा, नर्सरीच्या व्हरायटी तसेच प्लॉस्टीक सीटचा दर्जा उत्तम असावा, बागांच्या डाटा कलेक्शनसाठी जी.पी.एस. द्वारे आढावा घ्यावा.

जिल्हास्तरावर क्लोड स्टोरेजची व्यवस्था असावी, वाहतुकीसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्यात, जानेवारी ते मार्च हा देशांतर्गंत द्राक्ष पाठविण्याचा हंगाम असल्याने या कालावधीत अतिरिक्त रेल्वेसेवा (वॅगन) ची उपलब्धता असावी, औषध फवारणी मुळे द्राक्ष खाण्यास घातक असतात हा अपप्रचार थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, फार्मर प्रोट्रेक्टर ॲक्टमध्ये बदल करावा,

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com