शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात द्यावी; झिरवाळकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात द्यावी; झिरवाळकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट (hail) झाल्याने येथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (crop damage) झाले आहे. बळीराजाच्या (farmers) हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे.

या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) येथील टोमॅटो, कांदा, गहू, हरबरा, मसूर, कांदा, कोबी व इतर भाजीपाला पिकांसह द्राक्ष, डाळिंब अशा फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी (farmers) अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला शासनाची तातडीने मदत मिळावी म्हणून,

नुकसान झालेल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे (panchanama) कण्यात यावेत आणि शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of Legislative Assembly Narahari Jirwal) यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (memorandum) दिले आहे.

अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान (financial loss) झाले आहे. शेतमालाला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी हवालदील आहे, त्यामुळे तातडीने पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी या निवेदनात झिरवाळ यांनी केली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक टोंगारे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com