खरिप हंगामासाठी शेतकरी सज्ज

खरिप हंगामासाठी शेतकरी सज्ज

निफाड। प्रतिनिधी | Niphad

आगामी पावसाची चाहूल विचारात घेता तालुक्यात कृषी विभागाने (Department of Agriculture) खरिप हंगाम (Kharip Season) पेरणीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यावर्षी 37325 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असून त्यासाठी 8481 क्विंटल बियाणे (Seeds) लागणार आहे. तर खरिप हंगाम यशस्वी व्हावा यासाठी कृषी विभागाने 27200 मे. टन खतांची मागणी (Demand for fertilizers) नोंदविली असून टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा (Fertilizer supply) सुरू झाला आहे.

सोयाबीन पिकाला (Soybean pick) वाढता भाव बघता यावर्षी सोयाबीन पीक पेरणीचे क्षेत्र वाढणार असून मकाचे क्षेत्र अल्पसे कमी होणार आहे. खरिप हंगामात बाजरीसाठी 457 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 14 क्विंटल बियाणे लागणार आहे. तर मका साठी 9250 हेक्टर क्षेत्र अधिगृहीत करण्यात आले असून त्यासाठी 1850 क्विंटल बियाणे लागणार आहे. बाजरी व मका बियाणे बदलावे लागत नसल्याने कमी प्रमाणात लागणार आहे. तर तुरीसाठी 471 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 22 क्विंटल बियाणे लागणार आहे.

तसेच मुग साठी 466 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 21 क्विंटल बियाणाची मागणी नोंदविण्यात आली आहे. उडीद साठी 600 हेक्टर क्षेत्रासाठी 28 क्विंटल बियाणे लागणार आहे. तर भुईमुंग साठी 500 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 150 क्विंटल बियाणे मागणी नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनसाठी 24200 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 6350 क्विंटल बियाणे लागणार आहे. तालुक्यात कपाशीचे उत्पादनात वर्षागणिक घट होत असल्याने या हंगामात कपाशी साठी 80 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी प्रत्येकी 450 ग्रॅम वजनाच्या प्रत्येक पाकीटापैकी 240 पाकिटे लागणार आहे.

तर खरिप कांदा (onion) साठी 1300 हेक्टर क्षेत्र गृहित धरून त्यासाठी 44 क्विंटल बियाणाची आवश्यकता लागणार आहे. तालुक्यात खरिप हंगामात (kharip season) लाल कांद्याबरोबरच (red onion) सोयाबीनचे क्षेत्र वाढतांना दिसत असून कपाशी, बाजरी, भुईमुंग, उडीद, तुर, मुग आदींचे क्षेत्र कमी होवून त्याऐवजी शेतकरी (farmers) सोयाबीन पिकाकडे वळतांना दिसू लागला आहे. यावर्षी हवामान खात्याने पावसाची शक्यता (Chance of Rain) लवकर वर्तविल्याने खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा यासाठी शेतकरी (farmers) आत्तापासूनच नांगरणी, वखरणी, फणणी आदी कामात व्यस्त झाला आहे.

खरिप हंगामासाठी तालुक्यात 27200 मे. टन खतांची आवश्यकता भासणार असून कृषी विभागाने खतांचे योग्य नियोजन केले असून खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. खरिप हंगामासाठी युरिया 9000 मे.टन, डी.ए.पी 3200 मे.टन, एम.ओ.पी 1000 मे.टन, सिंगल सुपर फॉस्फेट 5000 मे.टन, इतर संयुक्त खते म्हणजेच एन.पी.के 9000 मे.टन खतांची मागणी नोंदविण्यात आली असून टप्प्याटप्प्याने या खतांच्या रॅक तालुक्यात दाखल होवून खतांचे वाटप खत विक्रेत्याकडे सुरू झाले आहे.

तसेच खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा यासाठी कृषी विक्रेत्यांनी खते, बियाणे यांचा स्टॉक केला असून आता हे व्यवसायिक शेतकर्‍यांच्या प्रतिक्षेत आहेत. मागील वर्षी परतीच्या पावसामुळे हातात आलेल्या खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती होवू नये अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहेत. त्यातच करोना काळापासून खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून अनेकवेळा खत दुकानातून खते गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यावर्षी असे घडू नये यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

शेतकर्‍यांची फसवणूक टाळावी खरिप हंगामात खते, औषधे, बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही. तसेच खत टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तसेच त्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मात्र कुठे खतांची टंचाई अथवा ज्यादा पैसे घेतले जात असेल किंवा बनावट बियाणे, खते विक्री होतांना दिसले तर कृषी विभागाशी तत्काळ संपर्क साधावा. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- बाळासाहेब खेडकर, कृषी अधिकारी (पं.स. निफाड)

Related Stories

No stories found.