ग्रामपंचायतीसमोर शेतकर्‍यांचे धरणे; पुणतांबा आंदोलनास पाठिंबा

ग्रामपंचायतीसमोर शेतकर्‍यांचे धरणे; पुणतांबा आंदोलनास पाठिंबा

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

शेतकरी क्रांती मोर्चाच्या (Farmers Revolutionary Front) माध्यमातून मुंजवाड, ता. बागलाण (baglan) येथील शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीसमोर (gram panchayat) पाच दिवसीय धरणे आंदोलन (agitation) करीत

शासनास विविध मागण्यांचे निवेदन (memorandum) देत पुणतांबा (Punatamba) येथील शेतकरी (farmers) आंदोलनास पाठिंबा दर्शविला. याआधी मुंजवाड ग्रामपंचायतीने शेतकरीहिताचे बरेच निर्णय शासन दरबारी पोचविण्यासाठी ग्रामसभेत ठराव एकमुखाने मंजूर करून संदर्भीय आशयाचे निवेदन बागलाणच्या तहसीलदारांना सुपूर्द केले होते.

पुणतांबा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर शेतकरी हिताचे ठराव ग्रामसभेत मंजूर करणारी मुंजवाड ही बागलाण तालुक्यातील (baglan taluka) पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. मुंजवाडचे अनुकरण करून पंचक्रोशीतील दहा ते पंधरा ग्रामपंचायतींनी शेतकरीहिताचे ठराव करून पाठिंबा दर्शविला आहे. दि. 1 जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होत मुंजवाड गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी पाठिंबा दर्शवित आहेत. शेतकर्‍यांमध्ये राज्य व केंद्र सरकारविरुद्ध (central government) नाराजी व्यक्त होत आहे.

कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. काल प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, प्रहार तालुका जनशक्ती पक्षाध्यक्ष कपिल सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव, बागलाण तालुका कांदा उत्पादक संघटना उपाध्यक्ष सुभाष शिंदे, प्रगतिशील शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे आदी पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

या पाच दिवसीय आंदोलनास कुठल्याही लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही व दखल घेतली नाही तर त्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात येईल, असे माजी सरपंच गणेश जाधव यांनी यावेळी ठणकावून सांगितले. केशव सूर्यवंशी, मिलिंद जाधव व सर्व शेतकर्‍यांनी लोकप्रतिनिधींनीवर नाराजी व्यक्त करत आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. याप्रसंगी तरुण शेतकरी श्रीपाद जाधव, भिक सूर्यवंशी, सोसायटी चेअरमन कारभारी जाधव,

वैभव अहिरे, स्वप्निल पगार, नानाजी जाधव, गोपाळ जाधव, दादा फीटर, एकनाथ बोरसे, नामदेव बच्छाव, दीपक जाधव, घनश्याम जाधव उपस्थित होते. याप्रसंगी शेतकर्‍यांच्या वतीने सरपंच प्रमिला पवार, ग्रामसेवक भामरे तलाठी गरुड, पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी यांच्यामार्फत प्रशासनास निवेदन देण्यात आले. राज्यातील सर्व शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची असून सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केशव सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com