
नाशिक | प्रतिनिधी |Nashik
भारतीय कमयुनिस्ट पार्टी (Communist Party of India) (मार्क्सवादी लेनिनवादी रेड स्टार)च्या वतीने आज चेन्नई-सुरत महामार्ग (Chennai-Surat Highway) विरोधात शेतकर्यांचे (farmers) आंदोलन (agitation) करण्यात आले.
येथील भालेकर मैदानावर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) आंदोलन करण्याची परवानगी न मिळाल्याने शेतकरी (farmers) मोठ्या संख्येने बी डी भालेकर येथेच थांबले.
मजदूर किसान सभा, शेतकरी संघर्ष समिती यांच्या तफे राजपालसिंग शिंदे, अरुण वेळासकर यशवंत लकडे, मस्तन चौधरी, समीर शिंदे, दिगंंबर हांंडगे, महेश घोलप, ज्ञानेश्वर खाडे, आदींनी जिल्हादधीकारी गंगाथरण डी. (District Collector Gangatharan D.) यांंना मागण्याचे निवेदन (memorandum) दिले.
त्यात म्हटले आहे की. या महामागासाठी अधीग्राहन केल्या जाणार्या जमीनीला बाजार भावाच्या पाच पट मोबदाल मिळावा, जिल्ह्यात इतर भागात बागायती जमीनी देण्यात यावी, कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घ्यावे, शेतकर्र्यांना कायम स्वरुपी टोल वसुलीच्या (Toll collection) उत्पन्नातुन पाच टक्के रमक्कम बाधीत गावाना द्यावी, ज्या जमीनी सातबारा उतार्यावर जिरायती दाखवील्या त्या बागायती दाखवाव्यात.
प्रश्न सोडवील्या शिवाय कोणतेही काम आम्ही येथे होऊ देणार नाही. असे शिंदे वेळासकर यांंनी स्पष्ट केले. या आंदोलनात समीर शिंदे, सानप, कातींलाल बोडके, अनील सोनवणे, गणेश ढिकले, भाऊसाहेब गोहाड, प्रभाकर कांडेकर, समाधान पगारे, किशेार धागे, समाधान खांदवे, रावसाहेब जाधव, प्रकाश उगले, हरीश शिंदे, भाऊसाहेब सिरसाठ सहभागी झाले होते.