टरबूज शेतीला शेतकऱ्यांची पसंती

टरबूज शेतीला शेतकऱ्यांची पसंती

पंचाळे । प्रभाकर बेलोटे | Panchale

सिन्नर तालुक्यात (sinnar taluka) प्रामुख्याने खरीप (kharip) व रब्बी हंगामात (rabbi season) ऊस (cane), मका (Maize), बाजरी (Millet), सोयाबीन (Soybean), गहू-हरभरा ही पिके घेतली जातात. यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी (Rainfall) झाली.

त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना (farmers) रब्बी हंगामातील उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे विहिरीमध्ये असलेल्या अल्प पाण्याच्या भरोशावर शेतकर्‍यांनी टरबूज लागवडीकडे (Watermelon planting) लक्ष केंद्रित केले आहे.

विहीरींमध्ये पूरेसे पाणी नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर टरबुजाची लागवड केली आहे. करोना (corona) प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष टरबुजाचा योग्य भाव शेतकर्‍यांना मिळाला नाही. अत्यंत मातीमोल भावात शेतकर्‍यांना माल विकावा लागला तर अनेक ठिकाणी टरबुजाचा (Watermelon) वापर जनावरांना चारा म्हणून करण्यात आला.

त्यामुळे मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. व्यापार्‍यांकडून टरबूजाला मागणी नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी (farmers) त्यांच्या स्वतःच्या वाहनातून आठवडे बाजारात, रस्त्यावर टरबूजाची विक्री केली. मागील वर्षी झालेला तोटा भरुन काढण्यासाठी यावर्षी पूर्व भागातील पंचाळे, धनगरवाडी, मेंढी, वडांगळी, किर्तांगळी, सोमठाणे, सांगवी, दहिवाडी,

उजनी या गावातील शेतकर्‍यांनी गोदावरी (godavari) उजवा कालवा व कडवा कालव्याच्या आवर्तनातून पाणी मिळण्याची खात्री असल्याने मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड केली आहे. कलिंगड (टरबूज) लागवडीसाठी शेतकरी प्रामुख्याने नर्सरीतील (Nursery) रोपांचा वापर करतात. त्यामुळे टरबुजाची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात मिळते असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टरबूज लागवडीचे गणित

एका एकरासाठी टरबूजाची 6 हजार रोपे लागतात. प्रति रोप तीन ते चार रुपये दर असून त्यासाठी 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. दोन रोपातील अंतर साधारणत: एक ते दीड फूट असते.दोन सर मधील अंतर चार फूट असते. टरबूज तयार होईपर्यंत मशागत, रोपे, मल्चिंग, ठिबक सिंचन यावर साधारणत: 70 ते 80 हजारांचा खर्च होतो. एका टरबुजाचे वजन चार ते पाच किलो असते. त्यामुळे एका वेलीवर 12 ते 15 किलो उत्पादन मिळते. वीस रुपये प्रति किलो दराने टरबूज गेल्यास एका रोपापासून 70 ते 80 रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे एका वेलीपासून तीनशे ते चारशे रुपये उत्पन्न अपेक्षित असते.

यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाल्याने टरबुजाला मोठी मागणी राहील. तसेच द्राक्ष पिकावरील उत्पादनासाठी भरमसाठ खर्च करूनही उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे खर्चाचा व उप्तादनाचा विचार केल्यास टरबूज इतर पिकांपेक्षा फायदेशीर ठरत आहे.

सोमनाथ पगार, टरबूज उत्पादक शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com