'या'कारणामुळे तवली धरणाला शेतकर्‍यांचा विरोध

'या'कारणामुळे तवली धरणाला शेतकर्‍यांचा विरोध
USER

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील हिवरे व पाडळी शिवारात कोट्यावधी रुपये खर्च करुन साकारण्यात येणार्‍या तवली धरण प्रकल्पाला (Dam project) शेतकर्‍यांनी (farmers) विरोध दर्शवला आहे.

प्रकल्पासाठी संपादित होत असलेल्या शेतजमिनीच्या गट क्रमांकाची माहिती मिळावी व प्रकल्पाकरिता जमिनी संपादन (Land Acquisition) करण्यासही शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवत याबाबत जिल्हाधिकारी (Collector), ग्रामीण पोलिस अधिक्षक, तहसिलदारांना निवेदन (memorandum) दिले आहे.

तवली धरण प्रकल्प होत असलेले हिवरे व पाडळी ही गावे खडकाळ व डोंगराळ परिसरात येतात. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या येथील शेतकर्‍यांना अत्यंत कमी शेतशिवार उपलब्ध आहे. उपलब्ध असलेल्या अल्प शिवारात येथील शेतकरी (farmers) शेती व्यवसाय करुन आपली उपजिवीका करत आहेत. अशा परिस्थितीत आ. कोकाटे यांनी स्थानिक शेतकर्‍यांना कोणतीही माहीती न देता पाटबंधारे खात्याकडून (Irrigation Department) धरण बांधण्याकरीता भुमिपुजन (bhumipujan) करण्याचे ठरविल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

वास्तविक कोणताही प्रकल्प घोषित करताना त्यासाठी जमिनी संपादन (Land Acquisition) करण्यासाठी कायद्यात दिलेल्या सर्व तरतुदीचे तंतोतंत पालन करुन व संबंधित प्रकल्पासाठी 65% जमिनधारक स्वखुशीने जमिनी देण्यास तयार असावे लागतात. तरच प्रकल्प शासन मंजूर करते. मात्र, हिवरे व पाडळी परिसरातील कोणत्याही शेतकर्‍याला नोटीसा (Notice) न बजावता स्थानिक लोकप्रतिनिधींना गृहीत धरुन या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

प्रकल्पामुळे येथील शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीचा व किती शेतकरी भुमिहीन होणार याची कोणतीही शहानिशा न करता थेट मंत्री मंडळ बैठकीत निधी (fund) मंजुर करुन घेऊन प्रकल्पाचा रविवारी (दि.29) भुमिपुजन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकार पुर्णतः बेकायदेशीर असुन परिसरातील शेतकर्‍यांवर हा अन्याय करणारा असल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी जमिनी न देण्याचा निर्णय घेतला असून शासनाच्या वरीष्ठ पातळीवर चर्चा विनीमय करुन प्रकल्प त्वरीत स्थगित करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन (agitation) करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी शासनाने दांडगाई व जबरदस्तीचा प्रयत्न केल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन शासन शेतकर्‍यांना आत्महत्या (Suicide) करण्यास शासन भाग पाडत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी निवेदनात (memorandum) केला आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा प्रत्यक्ष येऊन जाणून घेव्यात अशी विनंती निवेदनात शेतकर्‍यांनी केली आहे. निवेदनावर विश्वनाथ रेवगडे, अनुसयाबाई रेवगडे, नंदा रेवगडे, गणेश रेवगडे, रामनाथ रेवगडे, बाळू रेवगडे, आदीनाथ रेवगडे, मधुकर रेवगडे, रामनाथ ढोन्नर, लिलाबाई ढोन्नर, शांताराम ढोन्नर, दत्तात्रय ढोन्नर, अशोक ढोन्नर, दिनकर सहाणे, योगेश भालेराव, शशीकला सहाणे, बाळू बिन्नर, बबन बिन्नर, तुकाराम बिन्नर यांच्यासह पाडळी व हिवरे परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com