सुरत-हैदराबाद महामार्ग भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध

सुरत-हैदराबाद महामार्ग भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध

निफाड । प्रतिनिधी Nashik

निफाड तालुक्यातून Niphad Taluka जाणार्‍या सुरत-नाशिक-नगर-हैदराबाद Surat-Nashik-Nagar-Hyderabad Highway प्रस्तावित महामार्गासाठी चाटोरी, सावळी, पिंपळगाव निपाणी येथील शेतकर्‍यांच्या भूसंपादित होणार्‍या मिळकती या राजपत्रात जिरायती दाखवण्यात आल्या आहेत.

सुरत-हैदराबाद महामार्ग भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध
कसा असेल नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या

सद्यस्थितीत या जमिनीत द्राक्षबाग, डाळिंब, पोल्ट्रीफार्म, विहिरी, जलवाहिनी असून ही संपूर्ण शेती बागायती असल्याने व यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक असून भूसंपादनाचा मोबदला, नुकसान भरपाईचा दर याची माहिती अगोदर द्यावी अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या शेतकर्‍यांनी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

चाटोरी, सावळी, पिंपळगाव निपाणी येथील शेतकर्‍यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांची निफाडला त्यांच्या कार्यालयात भेट घेत निवेदन देऊन आपली व्यथा मांडली. निवेदनात या शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित सुरत-नाशिक-अहमदनगर-हैदराबाद या महामार्गासाठी होणार्‍या भूसंपादनाला आमचा विरोध आहे. भूसंपादित होणार्‍या आमच्या मिळकती राजपत्रात जिरायती दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे चुकीचे आहे.

कारण या सर्व जमिनी बाराही महिने बागायती आहेत. तसेच गोदावरी नदीपासून जवळ आहेत. या महामार्गासाठी संपादित होणार्‍या जमिनीत सद्यस्थितीत द्राक्षबागांसह डाळिंब तसेच पोल्ट्रीफार्म, जनावरांंचे गोठे, घरे, कूपनलिका, जलवाहिन्या असून या भागातील अनेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यामुळे राजपत्रातील या चुका त्वरित दुरूस्त कराव्यात. तसेच ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत अशा शेतकर्‍यांच्या घरातील किमान एका व्यक्तीस भारत सरकारने नोकरी द्यावी.

तसेच या महामार्गासाठी भूसंपादन land acquisition करताना येणार्‍या अडचणी, अडथळे यावर निर्णय घेण्यासाठी आमच्या गावातील स्थानिक नागरिकांची कमिटी बनवून तिचे मत विचारात घेण्यात यावे. तसेच अधिसूचनेप्रमाणे भूसंपादन करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी, जमीनदार व त्याची वैयक्तिक हरकत घेण्याचा हक्क देखील राखून ठेवण्यात यावा. तसेच अटी, शर्ती व मोबदला याबाबत खुली चर्चा न झाल्यास व भूसंपादनाच्या मोबदल्यात नुकसान भरपाईचा दर याची माहिती आगाऊ न दिल्यास त्याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे.

निवेदनाप्रसंगी पिंपळगाव निपाणी येथील ज्ञानेश्वर रामभाऊ खाडे, वसंत बोडके, शिवाजी बोडके, रामनाथ महादू डोंगरे, वाळीबा डोंगरे, सुनील बोडके, तानाजी बोडके, सावळी येथील विक्रम सानप, भाऊसाहेब बोडके, मुरलीधर बोडके, बबलू बोडके, साहेबराव बोडके, भास्कर बोडके, संपत सानप, चाटोरी येथील दिगंबर हांडगे, निवृत्ती घोलप, अनिल सोनवणे, सुकदेव घोलप, अनिल जाधव, भिवसन हांडगे आदींसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ सोशल डिस्टन्स पाळूनउपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com