
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Nashik District Central Bank) अनागोंदी कारभारामुळे आम्ही दोन्ही भावंडांनी संचालकपदाचा राजीनामा (Resigned) दिला असून सद्यस्थितीत बँकेची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
विकास सोसायट्यांना कर्जपुरवठा बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी (farmers) अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा कृषि औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे (Advai Hiray, Chairman, District Agro-Industrial Association) यांनी केले.
तालुक्यातील कुकाणे ग्रामपंचायत मुख्यालयाच्या नूतन इमारतीसह विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी अद्वय हिरे बोलत होते. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत मुख्यालय इमारतीसह 15 व्या वित्त आयोगांतर्गत आदिवासी वस्ती रस्ता व मुरळेश्वर रस्त्याचेही उद्घाटन झाले. यावेळी कुकाणे गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कृऊबाचे माजी सभापती प्रसाद हिरे, भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, व्यापारी आघाडीचे नितिन पोफळे, श्रावण महाराज अहिरे आदी उपस्थित होते.
कुकाणे हे गाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांचा वारसा जोपासत असून गावाला उच्च विद्याविभुषित सरपंच लाभल्याने विकासाची कामे गतिमान झाली असल्याचे नमूद करून एक उच्चशिक्षित सरपंच विकास करु शकतो तर आपले स्थानिक मंत्री का करु शकले नाहीत, असा सवाल करत अद्वय हिरे यांनी नाव न घेता कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्यावर टिकास्त्र सोडले.
15-20 वर्षात स्थानिक आमदार आपल्या मतदार संघाचा विकास करु शकले नाहीत. मालेगांव महापालिकेचही (Malegaon Municipal Corporation) दयनीय अवस्था आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी ‘बॅनरछाप’ पुढारी बनले आहेत. जागोजागी बॅनर झळकावून तेच ते फलक जागा बदलून लावले जातात आणि विकास केल्याचा देखावा निर्माण केला जातो. या कालावधीत कोणती ठोस विकासकामे झालीत, हा देखील संशोधनाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी प्रसाद हिरे यांनी कुकाणे गावाचा प्रतीआळंदी असा उल्लेख करत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी येथील महिला सरपंचानी विधवा स्त्रियांच्या हस्ते वटवृक्ष लागवड करुन सामाजिक बदलाची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. सरपंच डॉ. राजश्री अहिरे, उपसरपंच रखमाबाई खैरनार व ग्रा.पं. सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमास वजीरखेडे सरपंच विनोद बोरसे, डाबली सरपंच गणेश भोसले, सोसायटी चेअरमन गोविंद लोंढे, विष्णू अहिरे, नंदू लोंढे, भानुदास अहिरे, माया अहिरे, शोभा पगारे, मिना निकम, सुरेश अहिरे, गोरख अहिरे, बाबूलाल मगरे, राजेंद्र गोसावी, धर्मा ह्याळीज, ग्रा.पं. सदस्या शुभांगी शेवाळे, सुनील खैरनार, सुवर्णा अहिरे, रोहिणी सोनवणे, ग्रामसेवक सुनील पवार आदिंसह पंचक्रोषीतील सरच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.