बिबट्याचा वावर; पिंपळगाव परिसरातील शेतकरी हवालदिल

बिबट्याचा वावर; पिंपळगाव परिसरातील शेतकरी हवालदिल

सातपूर । Satpur

सातपूर विभागातील पिंपळगाव बहुला शिवारात गेल्या आठवड्यात सलग तीन बिबटे जेरबंद झाले होते. या बिबट्यांपैकी एक बछडा अद्यापही आढळून आलेला नसल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

पिंपळगाव बहुला शिवारात माजी सभापती सुरेखा गोकुळ नागरे यांच्या मळ्यात बिबट्याची मादी व तीन बछडे वावरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. परिसरातील शेतकर्‍यांमध्ये त्यामुळे भीती पसरलेली होती.

वनविभागाने तातडीने नागरे यांच्या उसाच्या मळ्यात पिंजरा लावला होता. सलग दोन दिवसाआड एक आठवड्यात तीन बिबटे जेरबंद झाले. त्यात एक मादी आणि दोन बछडे यांचा समावेश होता. मात्र अद्यापही एक बछडा सापडून आलेला नसल्याने वनविभागाच्या वतीने रोज पिंजरा लावून त्याचे अवलोकन केले जात आहे.

बछडा अजूनही शिवारात वावरत असल्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. शोध घेऊन या बछडा जेरबंद करावा, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

मळे परिसरात आपले निवासस्थान आहे. या लगतच पोल्ट्री, उसाचा मळा असून या परिसरात बिबट्याचा वावर हा कुटुंबासाठी भीती निर्माण करणारा आहे. तातडीने त्याचा बंदोबस्त करावा.

- गोकुळ नागरे, सामाजिक कार्यकर्ता

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com