कांदा उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकरी

दिंडोरी : निर्यातबंदीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत

ओझे | Oze

कांदा निर्यात बंदी करून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असुन जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असुन शेतकरी वर्गाचे अश्रू कोण पुसणार, असा सवाल निर्माण झाला आहे.

रब्बी व खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या बळीराजांला आता तरी सुगीचे दिवस येतील, असे वातावरण जवळ जवळ तयार झाले असताना एका घोषणेने त्यावर पाणी फिरले.

बदलत्या हवामानातील पिकांवर होणार परिणाम, पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ, भांडवलाची कमतरता, भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण, इ.संकटातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत असताना सरकारने कांद्यावर निर्यात बंदी करून बळीराजांला अडचणीत आणले आहे.

सध्या लाॅक डाऊनची स्थिती असल्यामुळे बियाने व रोपे मिळवण्यासाठी शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली. बुकिंग करून ही बियाने व रोपे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या असतांना सरकारने हा निर्णय घेऊन खरीप हंगामातील आशेवर अवकृपाच केली आहे.

तर पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले. परिणामी कांदा पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी आली. आता कांदा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला आहे.

अनेक समस्यांचा सामना करून थोडा फार कांदा जतन करून ठेवला होता. त्यानंतर चांगला भाव मिळत असताना ऐनवेळी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी घोषीत केल्याने कांदा मातीमोल झाला आहे. तरी कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी ही मागणी जोर धरीत आहे.

- संदिप कुटे, कादां उत्पादक शेतकरी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com