खते
खते
नाशिक

दिंडोरी तालुक्यात खत टंचाईने शेतकरी त्रस्त

बळीराजांचे नियोजन बिघडले

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजांने डोक्याला हात लावला आहे.

ओझे, परमोरी, करजंवण, लखमापूर, दहेगाव, वागळुद, अवनखेड, ओझरखेड, दहिवी, आदी परिसरातील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, भात,नागली, खुरसणी, काही ठिकाणी ज्वारी, बाजरी आदी खरीप हंगामातील पिकांनी चांगला जोमाने वाढण्यास सुरुवात केली आहे. परंतु पिकांसाठी पोषक असलेले खतांची टंचाई निर्माण झाल्याने बळीराजांच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या युरिया टंचाई बळीराजां ञस्त झाला आहे. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला चिंतेने घर केले आहे. रब्बी हंगामात हातामध्ये काहीच न आल्याने शेतकरी वर्गाने आपले सर्व लक्ष खरीप हंगामासाठी केंद्रित केले आहे. परंतु बळीराजां वरील अस्मानी व सुलतानी संकटे , कृञिम संकटे, इ.संकटे पाठलाग सोडत नसल्यामुळे बळीराजांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

मध्यंतरी पावसाने आपला लहरी पणा दाखवत पोबारा केला होता. परंतु आता पिकाला पोषक असा झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर हसु निर्माण झाले होते. पण आता खताची कृञिम टंचाई निर्माण झाल्याने आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com