
पाळे खुर्द । वार्ताहर | Kalwan
कळवण तालुक्यातील (kalwan taluka) पाळे खुर्दसह परिसरात विजांच्या कडकडासह (lightning) जोरदार झालेल्या पावसामुळे (rain) पिकांचे गहू, हरभरा, टमाटे, मिरची भाजीपाला इ. पिकांची हेळसांड (crop damage) होऊन नुकसान झाले आहे.
या परिसरात मुख्य पीक म्हणून कांदा पिकाची (onion crop) लागवड प्रामुख्याने केली जाते. मोठ्या प्रमाणावर खर्च करून कांदा शेती शेतकर्यांनी कशीबशी उभी केली. मात्र अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) बळीराजाचे (farmers) कंबरडे मोडले आहे. शेतकर्यांनी विविध अडचणींवर मात करत शेती उभी केली मात्र आसमानी संकट शेतकर्यांची पाठ सोडायला काही तयार नाही.
शुक्रवारी चार वाजेच्या दरम्यान वादळी वारासह (Stormy wind) जोरदार पावसामुळे (heavy rain) पिकाची मोठी हेळसांड झाली. विजांच्या कडकडाट जोरदार पावसामुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान (crop damage) झाले आहे. शेतकरी पूर्णता हतबल झाला असल्याचे बघावयास मिळते.
पाळे खुर्द तसेच कळवण तालुक्यातील बहुतांशी भागात वादळी वार्यासह विजांच्या कडकडात जोरदार पाऊस झाल्याने शेती पिके संकटात सापडले आहेत. काढणीला आलेले पिकांचे नुकसान होऊन हेळसांड झाली आहे. वातावरणाच्या लहरीपणा पुढे शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे. त्यामुळे पंचनामे करुन त्वरीत भरपाई द्यावी.
- नामदेव गांगुर्डे पाळे खुर्द नामदेव गांगुर्डे, शेतकरी पाळे खुर्द