पाण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

पाण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirvade Vakad - Niphad

गोदावरी (Godavari) कालव्यांतून सन खरीप व रब्बी हंगामासाठी (kharif and rabbi seasons) वेळेवर आवर्तन सोडण्यात यावे, आवर्तनांच्या तारखा अगोदरच जाहिर करण्यात याव्या यासाठी शेतकर्‍यांच्या (Farmers) वतीने पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर (Irrigation Sub-Divisional Offices) लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

इंग्रजांनी नाशिक (Nashik), नगरच्या शेती सिंचनासाठी (Agricultural Irrigation) गोदावरी कालव्यांची (Godavari canals) निर्मिती करुन या कालव्यांना 11 टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. मात्र अद्यापही शेतकरी गोदावरी कालवे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे. आता हे कालवे आठमाही झाले आहेत. गतवर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत गोदावरी कालव्यांची खरीप हंगामासाठी दोन व उन्हाळी हंगामासाठी तीन असे पाच आवर्तने जाहीर करण्यात आली.

प्रत्यक्षात रब्बीचे केवळ एक व उन्हाळी एक असे दोनच आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे पाण्याअभावी अपरिमित नुकसान झाले. नंतर मात्र हेच उर्वरित पाणी टेस्टिंगच्या नावाने गोदापात्रात सोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी मागील पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती तयार केली आहे.

आगामी हंगामात आवर्तन तारखांसह जाहीर होऊन पाणी वेळेत मिळावे या मागणीसाठी शेतकर्‍यांच्या वतीने उपविभागीय कार्यालयात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. लोकप्रतिनिधी, कालवा सल्लागार समिती सदस्य, पदसिद्ध अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून त्यावेळच्या लाभक्षेत्रातील क्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन रब्बी व उन्हाळी हंगामातील आवर्तन संख्या व तारखा सर्वसंमतीने कार्यकारी अभियंता नाशिक हे कालवा सल्लागार समितीच्या (Canal Advisory Committee) बैठकीत जाहीर करतील असे उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले.

याप्रसंगी राजेंद्र खिल्लारी, संदीप देवकर, पद्माकांत कुदळे, हरिभाऊ शिंदे, अरुण चंद्रे, वाल्मिक सांगळे, विक्रांत रास्कर, रमेश टिळेकर, नरेंद्र गिरमे, सुभाष पांढरे, शिवाजी शिंदे, विलास पांढरे, अनिल शेवते, कैलास देवकर, हेमंत बोरावके, सुनील देवकर, दत्तात्रय शिंदे, विलास दवंगे, दिलीप दवंगे, गणेश घायतडकर, शंकर काळे, किशोर कदम, बाळासाहेब खोंड आदींनी उपोषण स्थळी भेट देत शेतकर्‍यांना पाठींबा दिला. पाटबंधारे विभागाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.