बळीराजाला आधुनिकतेची ओढ

आदिवासी भागात यांत्रिक शेतीकडे कल
बळीराजाला आधुनिकतेची ओढ
Farmer

पळसन | Palsan वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आदिवासी शेतकर्‍यांना दिला जाणार्‍या यांत्रिकीकरणाच्या योजनेचा लाभ तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी घेत आहेत. शेती कामात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे. हा एक आशेचा किरण दिसू लागला आहे.

कृषी विभागाकडून शेतीची अवजारे व शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून अर्थसहाय्य केले जाते. याचाच लाभ घेत पिंपळसोंड गावातील भात उत्पादक शेतकरी शिवराम चौधरी यांनी भात लावणीसाठी भाताच्या खाचरात पावर टीलरच्या साहाय्याने चिखल करीत शेतीकामात आधुनिकीकरण आणले आहे. बैल जोडी किंवा रेड्याचा नांगरणीसाठी उपयोगी केला जातो.

दिवसभर भाताच्या खाचरात चिखल करण्यासाठी चिखल तुडवावा लागत होता, मात्र डोल्हारे विभागीय मंडळाचे कृषी सहाय्यक गावित, गुलाब भोये, कृषी अधिकारी अशोक डमाले यांनी भात लागवडी यंत्र, भात कापणी यंत्र, मळणी यंत्र, चिखलणी करण्यासाठी पावर टिलरचा उपयोग चांगल्या तर्‍हेने होतो, हे महत्त्व पटवून दिले.

हे यंत्र आणल्याने कमी वेळेत,कमी खर्चात, कमी मनुष्यबळ यामुळे पैसा, वेळ, श्रमशक्तीची बचत झाली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला आहे. तालुक्यात या यंत्राचा वापर अलिकडे वाढत आहे, हे चित्र आशावादी आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com