धान खरेदीमुळे शेतकऱ्यांना फायदा

धान खरेदीमुळे शेतकऱ्यांना फायदा

नवी दिल्ली | New Delli

खरीप विपणन (Marketing) हंगाम (केएमएस) 2022-23 साठी सुरू असलेल्या धान खरेदीमुळे 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना (Farmers) फायदा झाला आहे. १ मार्च २०२३ पर्यंत सुमारे 713 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आणि किमान हमीभाव म्हणून 146960 कोटी  रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले.

कुठल्याही अडचणी-विना खरेदी प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाचे वितरण सुरु असून 713 लाख मेट्रीक टन धान खरेदीच्या  तुलनेत केंद्रीय साठ्यात सुमारे 246 लाख मेट्रीक टन तांदूळ (Rice) साठा प्राप्त झाला आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध आहे.

धान खरेदीमुळे शेतकऱ्यांना फायदा
कळवणच्या कन्येची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारली मुख्य भूमिका

चालू खरीप विपणन हंगाम  2022-23 च्या खरीप पिकासाठी, सुमारे 766 लाख मेट्रिक टन धान  (तांदूळाच्या बाबतीत 514  लाख मेट्रीक टन) खरेदी केले जाण्याचा  अंदाज आहे. चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 च्या रब्बी पिकासाठी, सुमारे 158 लाख मेट्रीक टन धान  (तांदळाच्या बाबतीत106 लाख मेट्रीक टन) खरेदीचा अंदाज आहे.

धान खरेदीमुळे शेतकऱ्यांना फायदा
कफ सिरप कंपन्यांच्या तपासणीसाठी मोहीम राबवा

रब्बी पिकाच्या समावेशासह, संपूर्ण खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये सुमारे 900 लाख मेट्रीक टन  धानाची खरेदी होण्याची शक्यता असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयातर्फे (Ministry of Food and Public Supplies) कळविण्यात आले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com