संततधारेत पिक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत

टोमॅटोंवर फळमाशीचे आक्रमण
संततधारेत पिक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत

ओझे । विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) चालू वर्षी पावसाने मागील अनेक वर्षाचे विक्रम मोडीत काढले असून यंदा तालुक्यात विक्रमी पाऊस (Record rainfall) पडला आहे.

त्यामुळे तालुक्यातील लहान मोठे सर्व धरणे जुलै महिन्यातच भरल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले मात्र सतत पडणार्‍या पावसामुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान पाहता बळीराजा मध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा बळीराजाने खरीप हंगामासाठी (kharif season) वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची (Vegetable crops) लागवड करून चांगलीच कंबर कसली होती. मात्र सतत पडणार्‍या पावसामुळे भाजीपाला पिकांवर विविध प्रकारच्या रोगानी अतिक्रमण केल्यामुळे शेतकर्‍यांना पिके वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुक्यात चालू वर्षी खरिप हंगामात शेतकरी वर्गाने टोमॅटो (tomato), दुधी भोपळा, कारले, दोडका, गिलके, गेवडा, चवळी, कोबी, फ्लावर आदींसह विविध प्रकारच्या पाले भाज्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यात प्रामुख्याने खरीप हंगामात हमखास दोनपैसे मिळून देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकांकडे शेतकरी वर्गाचा जास्त कल असतो.

तालुक्यासह जिल्ह्यातही टोमॅटोची विक्रमी लागवड झालेली होती, मात्र सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे शेतकरी (farmers) सध्या मेटाकुटीला आलेला आहे. त्यात प्रामुख्याने सध्या चालू असणार्‍या टोमॅटो पिकांवर फळमाशीने मोठया प्रमाणावर आक्रमण केलेले दिसून येत आहे.

हि फळमाशी फळाला बारीक छिंद्र पाडीत असल्यामुळे ते फळ खराब होत आहे. या फळमाशीमुळे टोमॅटो पिकांवर मोठे नविन संकट उभे राहिले आहे. टोमॅटो पिकांवर सध्या अतिपावसाने करपा, गेरवा, व्हायरस, बुरशी, सुकवा, फळकुज, फुलकुज, फुळअळी आदी रोगाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

महागडी औषधाची फवारणी करूनही रोग आटोक्यात येताना दिसत नाही. त्यात सतत पडणार्‍या पावसामुळे केलेली फवारणी धुवून जात असल्यामुळे फवारणीला पुरेसा वेळ मिळत नसल्याने रोगाचा धोका अधिकच वाढताना दिसत असल्यामुळे शेतकरी चालू वर्षीच्या खरीप हंगामात (kharif season) हैराण झालेला दिसत आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जास्त प्रमाणात नागपंचमीची टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा मोठ्या प्रमणात नर्सरीमधील (Nursery) टोमॅटो रोपे शेतकरी वर्गाने पसंती दिली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे टोमॅटो पिक रोगाला बळी पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून पुन्हा पुन्हा टोमॅटो लागवड केली आहे.

चालू खरिप हंगामात टोमॅटो पिकाला पोषक वातावरण नसल्यामुळे बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणाहून टोमॅटोची रोपे उपलब्ध करून नागपंचमीची टोमॅटो लागवड शेतकरी वर्गाने केली. अत्यंत महागडे किंमतीचे बियाणे, औषधे फवारणी करीत टोमॅटो पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने कष्ट घेतले. नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते. भरपूर भांडवल खर्च करून टोमॅटो पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने मेहनत घेतली.

आरली टोमॅटो पिकाला यंदा सततच्या पावसाने अनेक रोगाने ग्रासले आहे. शेतकरी टोमॅटो पिक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत पिक वाचविताना दिसत आहे. संततधार पावसाने आरली व नुतन लागवड केलेल्या टोमॅटो पिकावर संक्रांत आली. ती म्हणजे करपा, बुरशी आदी रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आढळत असल्यामुळे शेतकरी वर्गाला चिंतेचा विषय बनला आहे. लहान टोमॅटोच्या पिकाला बुरशी रोगाने विळखा दिल्याने त्या झाडाची वाढ होत नाही.

तसेच जे आरली म्हणजे नागपंचमीची टोमॅटो लागवड आहे. त्या झाडाची वाढ चांगला प्रकारे होत आहे. परंतु त्या झाडावर दोन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. करपा व सतत पाऊस चालू असल्यामुळे जी फुलकळी लागली आहे. त्यामध्ये पाणी साचून फुलकळी कुजण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे फुलकळी गळून पडत आहे. यंदा टोमॅटो पिकाची विक्रमी लागवड असल्यामुळे भाव मिळेल व नुकसान भरून निघेल यावर भाकीत करणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या काही शेतकरी वर्गाचे टोमॅटो विक्रीसाठी बाजारपेठेत दखल झालेले आहे. टोमॅटोला भाव ही चांगला मिळत आहे. परंतु आवक कमी असल्यामुळे भाव मापक आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने फळधारणेवर परिणाम होत असुन शेतकरी वर्गाला जेवढी फळ धारणा पाहिजे तेवढी मिळणे अवघड होईल असे सध्या चित्र दिसत आहे. सततधार पावसामुळे पिक वाचविण्यासाठी शेतकरी अत्यंत महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून पिकांवर फवारणी करीत आहे. परंतु पाऊस कधी कमी तर कधी जास्त या समीकरणांमुळे जी महागडी पावडर मारली जाते. ती पाण्याने धुऊन जात असल्यामुळे शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. शेतात वाहने जात नसल्यामुळे सर्व कामे बळीराजां स्वतःच्या ताकदीच्या आधारे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com