नाकर्त्या सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त

नाकर्त्या सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अतिवृष्टीग्रस्तांना Heavy Rain अल्प मदत देऊन शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळणार्‍या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबत बळीराजाची फसवणूक केली आहे. पीक विमा कंपन्यांना Crop insurance companies फायदा होईल अशा अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आपल्या भ्रष्ट नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील MP Unmesh Patil यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी आ.सीमा हिरे, देवदत्त जोशी, सुनील केदार, जगन अण्णा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार पाटील यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्‍यांना बांधावर जाऊन हेक्टरी 25 हजार हेक्टरी 50 हजार मदत द्या अशा मागण्या करणार्‍या उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षात राज्यातील अतिवृष्टीचा महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ मदत करत शेतकर्‍यांची चेष्टा केली.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना अलीकडे आघाडी सरकारने 10 हजार कोटी मदतीचे पैकेज जाहीर केले. त्या आधी जुलै मध्ये पूर आणि पावसाचा फटका बसलेल्यांना 11 हजार 500 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीमधील 7 हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनासाठी तर 3 हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ 1500 कोटींची तातडीची मदत करण्यात आली.

संपूर्ण मराठवाड्यात, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीमुळे 50 लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर जमीन खरवडून निघाली, जनावरे वाहून गेली, घरे पडली. मात्र सरकारी मदतीत शेतकर्‍यांच्या या नुकसानीचा विचारही केला गेला नाही.

शेतकर्‍यांना मदत द्यायची वेळ आली की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आघाडी सरकारने गेल्या 2 वर्षात वारंवार केला. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणार्‍या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला नैसर्गिक आघाताचा मारा सहन करणार्‍या राज्यातील शेतकर्‍यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com