पिक पंचनाम्यांसाठी मुदतवाढ देण्याची शेतकर्‍यांची मागणी

File Photo
File Photo

पंचाळे । वार्ताहर | Panchale

अतिवृष्टी (heavy rain) व ढगफुटी सदृश्य पावसाने (Cloudburst-like rain) झालेल्या नुकसानीच्या पंचनामे (panchanama) करण्यासाठी शासकीय कर्मचार्‍यांना

मुदतवाढ (extension of time) देण्याची मागणी पंचाळेचे उपसरपंच दुलाजी थोरात यांनी केले आहे. याबाबत त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) व तहसीलदार प्रशांत पाटील (Tehsildar Prashant Patil) यांच्याकडे याबाबत निवेदन (memorandum) सादर केले आहे.

यावर्षी सलग दोन महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतकर्‍यांनी जुलै महिन्यात बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन या खरिप पिकांची (Kharif crop) पेरणी केली. तसेच अनेक शेतकर्‍यांनी (farmers) ढोबळी, मिरची, टोमॅटो, काकडी, वाल यांचेही पीक घेतले. परंतु सलग दीड महिन्यापासून पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने अनेक पिकांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साठलेले आहे

त्यामुळे अनेक पिके पिवळी पडली असून अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीमुळे (heavy rain) पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सध्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे पंचनामा करण्याचे काम करत आहे, परंतु, अत्यंत कमी कालावधीत हे पंचनामे (panchanama) होत असल्याने यातून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शासनाने आदेश देऊन व शेतकरी (farmers) हिताचा निर्णय घेऊनही केवळ कमी कालावधी असल्याने अनेक शेतकरी पिक नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यान पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने पीकपंचनाम्यानसाठी कालावधी वाढवून देण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा खर्‍या अर्थाने सर्व शेतकर्‍यांना फायदा होऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. त्यामुळे पीक पंचनामेंसाठी मुदतवाढ देण्याची गरज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com