...म्हणूनच चालवली द्राक्षबागेवर कुऱ्हाड

...म्हणूनच चालवली द्राक्षबागेवर कुऱ्हाड

पिंगळवाडे | Pingalwade

द्राक्ष (Grape) हे सर्वात महागडे पीक समजले जाते. यासाठी झाड लागणीपासून ते माल निघेपर्यंत साधारण पाच लाख रुपये एकरी खर्च होतो. अशातच कसमादे परिसरात बहुतांश शेतकरी अर्ली द्राक्ष (Early Grapes) घेतात...

अर्ली द्राक्षास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) चांगला भाव मिळतो. व शेतकऱ्यांना (Farmers) बऱ्यापैकी पैसा मिळतो मात्र गत दोन ते तीन वर्षांपासून अवकाळी पावसाने (Rain) झटका दिल्याने कुठल्याही शेतकऱ्यास एक रुपयाही मिळाला नाही.

या वर्षी शेतकऱ्यांनी द्राक्ष पीक घेण्याचे ठरवले व आपल्या बागाही फुलवल्यात. पण रासायनिक औषधे व खते यांच्या किमती प्रमाणाबाहेर वाढल्याने पीक घेणे अवघड आहे. यातच मजुरी ही वाढली, या सर्व परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांना द्राक्ष शेती करणे अवघड वाटते.

तसेच जर माल पिकवून झाला आणि अचानक वातावरण बदललेच तर केलेला खर्च वाया जातो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवली शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शासन दरबारी रासायनिक औषधे व खतांच्या किमती कमी केल्या पाहिजेत. तसेच अर्ली द्राक्षास पीक विम्याचे कवच दिले पाहिजे. द्राक्ष व्यापारी यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार शासनदरबारी झाला पाहिजे तर द्राक्ष शेती वाचणार आहे. अन्यथा अर्ली द्राक्ष शेती ही लवकर नामशेष होईल, अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

माझ्या बागेचे मागच्या वर्षी अतोनात नुकसान झाले. यंदादेखील तीच परिस्थिति होणार होती. म्हणून मी संपूर्ण बाग काढून टाकली.

- कैलास भदाणे

अर्ली द्राक्षासाठी पिक विम्याची नितांत गरज आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

- पंडित शांताराम भामरे

Related Stories

No stories found.