खासगी धान्य खरेदीमुळे शेतकर्‍यांचा फायदा

खासगी धान्य खरेदीमुळे शेतकर्‍यांचा फायदा

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संचलित सुरगाणा (surgana) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील अर्थशास्त्र विभाग (Department of Economics) आणि एम. जी. व्ही. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ (Board of Economics Studies) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर (Principal Dr. C. G. Dighavakar) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा शहरातील बाजार समिती (Market Committee) अंतर्गत येणारी खाजगी धान्य खरेदी कशा पद्धतीने होते, याबाबत अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट घेण्यात आली.

यावेळी व्यापारी उत्तमचंद पगारिया यांनी विद्यार्थ्यांना (students) शेतकर्‍यांकडून (farmers) विविध धान्य तसेच तेलबिया वर्गीय खरेदी त्यामध्ये भात, नागली, वरई, उडीद, तूर, भुईमुंग, सूर्यफूल यांची खरेदी कशा पद्धतीने होते याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सुरगाणा येथे शासकीय धान्य खरेदी (Government grain purchases) अंतर्गत फक्त भाताची खरेदी केली जाते. भात हा सुद्धा उच्च प्रतीचाच खरेदी केला जातो.

मात्र पावसामुळे जर भाताचे नुकसान झालेले असेल तर असा भात शासकीय धान्य खरेदी अंतर्गत खरेदी केला जात नाही. इतर धान्य या शासकीय खरेदी मध्ये केली जात नाही. त्यामुळे सुरगाणा येथील शेतकर्‍यांना धान्याची विक्री व्यापार्‍यांना करावी लागते. वरई पासून भगर तयार करणारी सुद्धा मिल नाही. त्यामुळे व्यापार्‍यांना इथून भात आणि वरई ही गुजरातमध्ये (gujrat) आणि महाराष्ट्रातील (maharashtra) इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी पाठवावी लागतो.

त्यामुळे वाहतूक खर्च (Transportation costs) वाढतो. सरकारने जर सुरगाणा भागात भात आणि वरई वर प्रक्रिया करणारे उद्योग याला प्रोत्साहन दिले तर सुरगाणा भागाचा विकास होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील घुगे यांनी केले तर आभार प्रा. एम. झेड. चौधरी यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com