सिन्नर
सिन्नर
नाशिक

सिन्नर : कांदा लागवडीसाठी कुणी रोप घेत का रोप...

कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचाळे | Panchale

कांद्याची रोपे लागवडीसाठी घेता का? अशी शेतकऱ्यांना साद घालावी लागत आहे. कांद्याचे घसरलेले भाव यामुळे यावर्षी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

मागील वर्षीच्या जोरदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली. परंतु दीड ते दोन हजार रुपये कांद्याचे भाव मिळेल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला परंतु ऐन कांदा काढणीच्या वेळी म्हणजेच मार्च मध्ये करोनाचे संकट आले अन सर्वत्र लोक डाऊन जाहीर झाले. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज चालू बंद स्थितीत होते.

यावेळी माल कुठे विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. परिणामी भावात घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणुकीवर भर दिला. अद्यापही कांदा भावात सुधारणा होत नसल्याने कांदा खराब होत आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दहा ते बारा रुपये पायली भावाने कांद्याचे बियाणे घेऊन रोपे टाकली होती, त्यांना कांद्याचे रोप घेता का? अशी साद घालावी लागत आहे.

शेतकऱ्यांनी मका सोयाबीन बाजरी भुईमूग ही पिके घेतली. मका निघाल्या नंतरच क्षेत्र रिकामे झाल्यावर शेतकरी कांदा लागवडीचा विचार करणार आहे. महागडी रोपे, लागवड खर्च, खते कीटकनाशके, मजुरी यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवड करणे थांबविले आहे. परंतु त्याचा परिणाम कांद्याची रोपे लागवडी कालावधीच्या बाहेर जात असल्याने रोपे टाकलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com