
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात पावसाने (Rain) आतापर्यंत मालेगाव (Malegaon), नांदगाव (Nandgaon) व चांदवड (Chandwad) या तालुक्यांमधील काही भागात हजेरी लावली असल्याने या ठिकाणी खरीप पूर्व मशागतीला अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे...
मात्र, त्या तुलनेत जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात नाशिक तालुक्यातील इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), सुरगाणा (Surgana) या अधिक पावसाच्या (Rain) भागासह निफाड (Niphad), येवला (Yeola) या तालुक्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 16 जूनपर्यंत ६४.४ टक्के पाऊस झाला होता. मात्र, चालू वर्षी 16 जूनअखेर 59.59 टक्के (जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत) इतकाच पाऊस झाला आहे.
यावर्षी जून महिन्याची सरासरी पाहता मालेगाव तालुक्यामध्ये 155 टक्के, नांदगाव तालुक्यात 132 टक्के तर चांदवड तालुक्यात 120 टक्के इतका पाऊस १५ जुन अखेर झाला आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र जून महिन्याच्या सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही.
यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये चार टक्के, त्र्यंबकेश्वर पाच टक्के इतका अत्यल्प पाऊस झालेला आहे. बागलाण तालुक्यात 95 टक्के, कळवण तालुक्यात 80 टक्के, सुरगाणा तालुक्यात पन्नास टक्के, नाशिक 37.6 टक्के, दिंडोरी 70 टक्के पाऊस झाला आहे.
पेठ 27 टक्के, निफाड 58 टक्के, सिन्नर 89 टक्के, येवला 22 टक्के तर देवळा तालुक्यात 72 टक्के इतका पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५४.३ टक्के इतका पाऊस झाला आहे.
मागील वर्षी 15 जून अखेरपर्यंत यापेक्षा अधिक म्हणजेच ६४.४ टक्के इतका पाऊस झाला होता.
जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला असून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरीप पेरणीपूर्वी आवश्यक असा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.