शेती मशागतीसाठी बैलजोडीला पसंती

पेट्रोल, डिझेलचे दर ठरताय डोकेदुखी
शेती मशागतीसाठी बैलजोडीला पसंती

खेडलेझुंगे | वार्ताहर | Khedlezhunge

शेतकर्‍यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल (The tendency of farmers towards modern farming) वाढत असतानाच आता पेट्रोल, डिझेल, खते, औषधांच्या दरात मोठी वाढ (petrol, diesel, fertilizers, medicines price hike) झाल्याने यंत्राद्वारे शेती (Agriculture) करणे अवघड झाले आहे. साहजिकच ट्रॅक्टरऐवजी (Tractor) बैलजोडीने (Pair of bull) शेती मशागतीचा वापर वाढू लागल्याने बाजारपेठेत बैलांना मागणी वाढली आहे...

पूर्वीच्या काळी बैलजोडीनेच शेती मशागत केली जात असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत होऊ लागल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या तालुक्यात खरीप हंगामात तूर, ऊस, बाजरी, ज्वारी, मका, टोमॅटो, सोयाबीन आदी पिके घेतली जातात.

तालुक्याच्या सर्वच भागात पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र आता पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळताना दिसत आहे.

मशागतीसाठी आता शेतकरी बैलजोडी खरेदी करू लागला असून लासलगावच्या बाजारपेठेत रविवारी मोठ्या प्रमाणात बैलजोड्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. बैलजोडीचे दर लाख रुपयांवर पोहोचले असल्याने बैल घेणेही सोपे राहिले नाही. मात्र ट्रॅक्टरनेदेखील शेती परवडत नसल्याने शेतकरी उधार, ऊसनवार करून बैलजोडी खरेदीला महत्व देत आहे.

एकूणच वाढत्या महागाईमुळे तसेच लॉकडाऊनमुळे (lockdown) शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले असून अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना शेतीच्या उत्पन्नासाठी (income) निसर्गावर अवलंबून राहावे लागते. सध्या पावसाळा सुरू होऊनही अनेक भागात पावसाने हजेरी लावली नाही.

त्यातच शेतीसाठी मजूर मिळणेदेखील कठीण झाले आहे. त्यातच इंधनांचे दर, महागडी औषधे, खते, बियाणे आदीच्या किंमती शेती व्यवसायला परवडण्यासारख्या नाहीत. असे असतांनाही पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदल, पिकांवर होणारा रोगांचा प्रादूर्भाव यामुळे शेती करणे कठीण होत आहे.

अशातच खर्चात थोडीफार बचत व्हावी यासाठी शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे वळला असून अगदी थोड्याच कालावधीत शिवारात पुन्हा सर्जा-राजाची ललकारी ऐकावयास मिळणार आहे. खरीप हंगामात बैलांना मागणी वाढल्याने बैलजोडींच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com