मालेगाव : खंडीत वीज पुरवठ्याने शेतकरी हतबल

माळ माथ्यावर दिवाळी अंधारात
वीज
वीज

मालेगाव | Malegoan

तालुक्यातील टिंगरी वीज उपकेंद्रां अंतर्गत येणार्‍या माथ्यावरील गावांमध्ये सातत्याने खंडीत होत असलेला व कमी दाबाने केल्या जाणार्‍या वीज पुरवठ्यामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी अक्षरशः अहवालातील झाले आहे.

दिवाळी सणात देखील वीज पुरवठा खंडित ठेवल्या जात असल्याने प्रकाशाचा हा सण अंधारातच साजरा करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत व उच्च दाबाने न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे कृषीपंप मोठ्या प्रमाणात जळण्याचे प्रकार माथ्यावरील अनेक गावात घडत आहे. दिवसातून चार ते पाचच तास वीज पुरवठा व तोही कमी दाबाने केला जात असल्याने कांदा , चारासह फळबागांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी असून विजेअभावी ते पिंकाना देता येत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

टिंगरी वीज उपकेंद्र अंतर्गत दहिदी, हाताने, लेंडाने, डोंगराळे, खडकी, लुले गरबड, टोकडे, करंजगव्हान, वनपट, घानेगाव टिंगरी आदी गावांमध्ये गत तीन महिन्यापासून विजेच्या होत असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी हैरान झाले आहेत.

माळमाथा भागात 1980 मध्ये खांबांवर टाकलेल्या विजेच्या तारा चाळीस वर्ष झाले तरी अद्याप त्याच आहेत जीर्ण झालेल्या या तारा बदलल्या नसल्याने त्या तुटण्यासह वीजगळती चे प्रमाण वाढले आहे तसेच राजमाने येथील सौर ऊर्जा द्वारे वीज पुरवठा देखील केला जातो, मात्र सौर ऊर्जा वरील वीजपुरवठा ने कृषीपंप जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सौर ऊर्जा द्वारे होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाने होत असल्यामुळे कृषी पंप जळत असल्याची तक्रार शेतकर्यां तर्फे सातत्याने केली जात आहे, मात्र या तक्रारींची दखल वीज वितरण तर्फे हे घेतली जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे.

वीज वितरण कंपनी तात्काळ सुरळीत वीजपुरवठा व पोही पूर्ण दाबाने करावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा अशा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com