मजूर टंचाईने व बदलत्या वातावरणाने शेतकरी हतबल! रात्रीही होते कांदा लागवड

मजूर टंचाईने व बदलत्या वातावरणाने शेतकरी हतबल! रात्रीही होते कांदा लागवड

अभोणा | देवेन्द्र ढुमसे | Abhona

अभोणा (Abhona) परिसर तसेच कळवण तालुक्यात (kalwan taluka) यंदा कांदा लागवडीसाठी (Onion cultivation) लागणाऱ्या मजुरांच्या टंचाईने (Labor shortage) शेतकरी (farmer) हैराण झाले आहेत.

कळवण (kalwan), सटाणा (satana), मालेगाव (malegaon), देवळा (deola) हा कांद्याचे उत्पादन घेण्यात अग्रेसर व आगार म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पूर्णपणे कांदा पिकावरच (onion crop) अवलंबून असते.

त्यामुळे या भागातील शेतकरी उन्हाळी कांद्याची (Summer onion) मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. सगळीकडे एकाच वेळी कांदा लागवड व पावसाळी कांद्याची काढणी सुरू झाली असल्याने फार मोठी मजूर टंचाई झाली आहे.वेळेवर मजूर उपलब्ध होतीलच याची शाश्वती नाही.

आसमानी व सुलतानी सकटांवर मात करून शेतकरी वर्गाला मजूर मिळत नसल्यामुळे आभोण्याजवळील भगुर्डी येथील शेतकरी प्रकाश जाधव व वंजारी येथील शेतकरी परशराम ढुमसे यांनीं लोडशेडिंग व मजूर टंचाई मुळे चक्क रात्री कांदा लागवड केली मजूर दिवसा मिळत नसल्याने रात्रीच लागवड करावी लागली,

तसेच दिवसा मजूर वर्ग व्यस्त असल्यामुळे कांदा लागवड वेळेवर होणे गरजेचे असल्याने व बदलत्या हवामानामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी यांचे शेतकरी वर्गाकडे दुर्लक्षअसल्याचे चित्र स्पष्ट दिसत असे आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com