कांदा बाजार भाव पुढे शेतकरी हतबल

कांदा बाजार भाव पुढे शेतकरी हतबल

पाळे खु. । वार्ताहर | Pale Khurd/ Kalwan

कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदे पीक (onion crop) घेतले जाते. कळवण तालुक्यातील (kalwan taluka) कांदा (onion) हा कळवण (kalwan), अभोणा (aabhona), वणी (Vani), पिंपळगाव (Pimpalgaon) येथे कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी जात असतो. कांदा बाजार भाव पुढे शेतकरी (farmers) हतबल बळीराजाला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.

कळवण तालुक्यातील (Kalwan taluka) कांदा म्हणजे देशात एक नाव आहे. निर्यातीसाठी (export) या कांद्याला चांगली मागणी असते. कळवण तालुक्याच्या ग्रामीण भागात मुख्य पीक हे उन्हाळी कांदा (summer onion) घेतले जाते. बहुतांश बळीराजाचे आर्थिक गणित हे कांदा पिकावर अवलंबून असते यावर्षी चांगला भाव मिळेल, या आशेने अनेक दिवसांपासून कांदा हा शेतकर्‍यांनी चाळीत साठवून ठेवला. मात्र अनेक दिवसापासून साठवणूक केलेला कांदा हा खराब होण्यास सुरुवात झाली असून घट ही होत आहे.

साठवलेला कांदा हा मार्केटमध्ये विक्रीसाठी गेल्यावर अतिशय कमी बाजार भाव (market price) मिळत असल्यामुळे या बाजारभावात उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण आहे. बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले. आपला देश कृषी प्रधान ओळखला जातो दुसरीकडे त्याच बळीराजाच्या उत्पन्न खर्चही निघेनासा झाला आहे.

जगाचा पोशिंदा बळीराजा ने कष्टाने पिकवलेला कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघेणासा झाल्याने सरकारने कांदा बाजार भाव वाढीसाठी हस्तक्षेप करावा लवकरात लवकर कांदा बाजार भाव वाढीसाठी प्रयत्न करायला हवा असे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. शेतकरी (farmer) संकटात सापडला असल्याने एकावर एक संकट उभे राहत आहेत.

आधी अस्मानी संकट कर्ज काढून कांदा पीक लावणे कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च आहे बियाणे महागडे कांदा लागवड खर्च कीटकनाशके (Pesticides), रासायनिक खते (Chemical fertilizers) कांदा साठवणूक खर्च बदलते. वातावरण मजुरी महागडी या सर्वांचा सामना करत शेतकरी कांदा पिकवतो. या सर्व गोष्टीचा सामना करून शेतकरी पीक घेतो मात्र उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे कळवण तालुक्यातील शेतकरी पूर्णतः हाताश आणि निराश झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सध्या कांद्याला नऊ ते तेरा हा सरासरी भाव मिळत आहे या बाजार भावात उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण आहे आजच्या स्थितीत कांद्याला तीस ते पस्तीस रुपये किलो भाव पाहिजे होता लवकरात लवकर सरकारने कांदा भाव वाढण्यासाठी यात हस्तक्षेप करावा.

- किरण पाटील, शेतकरी पाळे खुर्द

कळवण तालुक्यातील शेतकरी हा उन्हाळी कांद्यावर सर्वच आर्थिक गणित अवलंबून असते. कांदा पिकांपासून दोन पैसे मिळाले तरच बळीराजाची काहीतरी गुजरण होईल नाहीतर बळीराजा पूर्णता कोलमडून जाईल. त्यामुळे शेतकी निराश झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

- निलेश निकम, कांदा उत्पादक शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com