द्राक्ष हंगाम लांबणीवर

मजूरटंचाईसह बनावट औषधांचीही शेतकर्‍यांना धास्ती
द्राक्ष हंगाम लांबणीवर

निफाड । प्रतिनिधी | Niphad

आठ-दहा दिवसांपासून परतीचा पाऊस थांबला असला तरी अद्यापही द्राक्षबागांमध्ये (vineyards) पावसाचे पाणी (rain water) कायम आहे.

साहजिकच पावसामुळे (rain) यावर्षी द्राक्षबागेचा हंगाम सुमारे दीड ते दोन महिने लांबणीवर पडणार आहे. त्यातच पावसानंतर थंडीतही (cold) मोठी वाढ झाल्याने यावर्षीचा द्राक्ष हंगााम (Grape season) शेतकर्‍यांसाठी (farmers) काहीसा आंबट जाण्याची शक्यता आहे. शासनाने गेल्या साठ वर्षांत द्राक्षबागांसाठी एकही नवीन जात शोधली नसल्याने शेतकर्‍यांना आहे त्याच जातीच्या द्राक्ष वाणाची लागवड करावी लागत आहे.

सुरुवातीला नगदी हमखास दोन पैसे मिळवून देणारे हे पीक आता अलीकडच्या काळात जुगार ठरू लागले आहे. मागील वर्षापर्यंत सप्टेंबरमध्ये द्राक्षबागेची छाटणी (Pruning the vineyard) पूर्ण केली जात होती. यावर्षी मात्र दिवाळीपासून (diwali) म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्षबागांच्या छाटणीने वेग घेतला आहे. त्यातच आता या द्राक्षबागांच्या कामासाठी पेठ (peth), सुरगाणा (surgana) तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर जातात.

मात्र तिकडेदेखील उशिराच्या पावसामुळे भात कापणीची कामे खोळंबल्याने हे मजूर अद्याप येऊ शकलेले नाही. त्यामुळे द्राक्षबागांसाठी मजूरटंचाईचे (Labor shortage) संकट कायम आहे. आता कुठे मजूरवर्ग थोड्या प्रमाणात येताना दिसू लागले असून द्राक्षबागा छाटणीनंतर पेस्ट, डिपिंग आदी कामांना वेग येणार आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळे द्राक्षबागेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषध फवारणी अडचणी येत आहेत. अनेकवेळा ट्रॅक्टरदेखील बागेतील दलदलीमुळे नादुरूस्त होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती (Natural disaster), वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases) आणि बाजारात बनावट औषधांचा वाढता वावर यामुळे औषधे फवारूनदेखील भुरी, मावा आदींसारखे रोग आटोक्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळे ड्रीपद्वारे पोषके, खते, औषधे देऊनही पाहिजे तशी फळधारणा होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडून पडले आहे. त्यातच दोन वर्षे करोना (corona) प्रादुर्भावामुळे द्राक्ष शेती कोलमडून पडली असून यावर्षी द्राक्ष हंगाम (Grape season) यशस्वी होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असतानाच परतीच्या पावसाने सर्वच पिकांची पुरती वाट लावली आहे.

परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांनादेखील मोठ्या प्रमाणात असून वर्षातून एकदाच येणार्‍या या पिकाचे नियोजनदेखील कोलमडून पडू लागले आहे. त्यातच दरवर्षीच द्राक्ष हंगामात व्यापारी पलायन ठरलेले. त्यामुळे द्राक्षपीक आता जुगाराचा धंदा ठरू लागले आहे. यावर्षी तर परतीच्या पावसाने द्राक्षबागांची पुरती वाट लागली असून त्यामुळे उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात घट होण्याचे संकेत मिळत आहेत. एकूण शासनाचे चुकीचे धोरण, बनावट औषधांचा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झालेला शिरकाव, मजुरांची टंचाई अन् खते, औषधांच्या किमती तसेच बेभरवशाचे बाजारभाव यामुळे शेती व्यवसाय अखेरची घटका मोजताना दिसत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com