केंद्र सरकारविरोधात शेतकरी, कामगारांचे आंदोलन

केंद्र सरकारविरोधात शेतकरी, कामगारांचे आंदोलन

सातपूर । प्रतिनिधी

करोना महामारीच्या दोन लाटांमध्ये कामगार व शेतकरी बांधवांनी सहकार्य केलं. मात्र केंद्र व राज्य शासन प्रशासनाने फारसे काळजीपूर्वक नियोजन केलेले नाही त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले यापुढे कामगार व शेतकरी टाचा घासून मरणार नाही, दिवाळे काढून मरणार नाही या भूमिकेतून तीन विविध मागण्या ठेवत शेतकरी कामगार संघटनांनी आज (दि.26) आंदोलन केले.

केंद्र व राज्य सरकारने दोन्ही लाटांमध्ये व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू ओढावला आहे. तिसर्‍या लाटेचे नियोजन व्यवस्थित करण्यासह विविध तीन मागण्या सीटू वतीने मांडण्यात आले आहेत त्यात प्रामुख्याने केरळच्या धर्तीवर 14 जीवनावश्यक वस्तूंच किट नागरिकांना द्यावे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 50 लाखाचा विमा सरसकट सर्वांना लागू करावा, 12 मे ते 23 मे दरम्यान जाहीर केलेल्या लॉकडाउनचे पूर्ण वेतन कामगारांना द्यावे, तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी करावी, फक्त चमकोगिरी करू नये, सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी खर्च लागणार नाही अशी व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले.

असंघटित कामगार उपेक्षीत

रिक्षा चालक, घरकामगार व बांधकाम मजूर यांना राज्य शासनाने पंधराशे रुपयांची मदत जाहीर केली. मात्र त्याचा लाभ अद्याप त्यांच्या खात्यात आलेला नसल्याने हे कामगार मेल्यावर त्यांना लाभ देणार आहेत काय? असा संतप्त सवाल डॉ. डी.एल. कराड यांनी उपस्थित केला. सरकारने पंधराशे रुपये तातडीने कामगारांच्या खात्यात वर्ग करावी व रोजगार बुडतो आहे तोपर्यंत ही रक्कम देत राहावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे संतोष काकडे कल्पना शिंदे तुकाराम सोनजे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com