'या' मागणीसाठी शेतकरी व सर्वपक्षीय नेते करणार रास्ता रोको आंदोलन

'या' मागणीसाठी शेतकरी व सर्वपक्षीय नेते करणार रास्ता रोको आंदोलन
USER

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

बोरी आंबेदरी धरणातून (Bori Ambedari Dam) बंदिस्त जलवाहिनी (Clogged aqueduct) द्वारे पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या मंजूर योजनेचे काम त्वरित सुरू करावे

या मागणीसाठी येत्या 12 डिसेंबर सोमवारी मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) रास्ता रोको आंदोलन (agitation) करण्याचा इशारा शेतकर्‍यांसह (farmers) सर्वपक्षीय नेते (All-party leader) व ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रांंत विजयानंद शर्मा (Province Vijayanand Sharma) व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतांना (Executive Engineer, Irrigation Department) या संदर्भात लाभार्थी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदन (memorandum) दिले आहे. झोडगे येथे योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍यांसह ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आंबेदरी धरणातून बंदिस्त जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या योजनेचे काम सुरू केले जात नसल्याबद्दल त्री व नाराजी व्यक्त केली गेली योजनेचे काम सुरू होत असल्याने झोडगे येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (agitation) करण्याचा निर्णय शेतकरी व ग्रामस्थांनी 18 नोव्हेंबर रोजी घेतला होता.

मात्र प्रांत व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतांनी चार दिवसात योजनेचे काम सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी हा रास्ता रोको चा निर्णय स्थगित ठेवला होता वरिष्ठ अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन देऊन वीस दिवस उलटले तरी योजनेचे काम सुरू झालेले नाही शेतकर्‍यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या या योजनेच्या कामास यंत्रणेतर्फे टाळाटाळ केली जात असल्याने या बैठकीत त्री व संताप व्यक्त केला गेला अधिकारी आश्वासनाचीपूर्ती करत नसल्याने येत्या 12 डिसेंबर रोजी सोमवारी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (agitation) करण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

प्रांत शर्मा यांना देण्यात आलेल्या निवेदनात आंबेदरी धरणातून बंदिस्त जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा करणार्‍या योजनेस काही शेतकरी त्यांच्या गैरसमजुतीतन विरोध करत आहे धरणातून पाटचारीद्वारे झोडगे तलावापर्यंत पाणी सोडले जाते परंतु 80% पाण्याची गळती होत असल्याने शेती सिंचनाचा प्रश्न दिवसे गणिक गंभीर होत आहे.

या संदर्भात शेतकर्‍यांनी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांचे लक्ष वेधले असता त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून बंदिस्त जलवाहिनीची योजना व 17 लाख 85 हजार चा निधी देखील मंजूर करून आणला आहे या योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाल्याने झोडगे सर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते या योजनेमुळे झोडगेसह दहिदी राजमाने मोहपाडा जळकु लखाने, अस्ताने या माळ माथ्यावरील अल्पवृष्टी असलेल्या गावांना शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्यासाठी मोठा लाभ होणार आहे.

माळ माथ्यावरील शेतकर्‍यांसाठी ही योजना संजीवनी ठरणार असताना सुद्धा तिचे काम सुरू केले जात नाही त्यामुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल यावेळी निर्माण होणार्‍या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आह. या बैठकीस सरपंच चंद्रकला सोनजे, उपसरपंच बेबाबाई देसले माजी सरपंच दीपक देसले, नथु देसले,

पंचायत समिती माजी सदस्य विजय देसले, प्रदीप देसले शिवाजी शिंदे प्रकाश काळगुडे, सुनील देसले नानासाहेब देसले पंडित देसले मुकेश गवांदे ज्ञानेश्वर देसले बाळासाहेब देसाई दीपक तलवारे विकास खेडकर निवृत्ती काळगुडे, सोमनाथ सोनवणे आदींसह झोडगे, अस्ताने, जळकु कंधाने लखाने परिसरातील शेतकरी ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com