शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगित

शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगित

येवला । प्रतिनिधी Yevla

शेती पंपांसाठी ( For agricultural pumps )महावितरण ( Mahavitaran ) कंपनीच्या 2020 च्या नव्या योजनेमध्ये बसवून येत्या महिन्याभरात अतिभारीत रोहित्र ( Extra Capacity Transformer ) बसवून साताळी गाव परिसरातील शेतकर्‍यांचा वीजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन महावितरण कंपनीचे ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. एम. पाटील यांनी आज दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती प्रा. अर्जून कोकाटे यांनी दिली.

राष्ट्र सेवा दल प्रणित शेतकरी पंचायतच्या ( Rashtra Seva Dal Pranit Shetkari Panchayat ) साताळी येथील शेतकरी कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता पाटील यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले, समक्ष चर्चा केली त्यावेळी, त्यांनी हे ठोस आश्वासन देऊन शेतकर्‍यांकडून शक्य तेवढ्या लवकर थकीत वीज बील भरण्याचाही शब्द घेण्यास ते विसरले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून येवला तालुक्यातील साताळी, चिचोंडी, भिंगारे, महालखेडा, नेऊरगाव, निमगाव मढ, आदी गावांमध्ये महावितरणचा वीज पुरवठा अनियमित, कमी दाबाने आणि बेभरोशाचा होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अचानक डी पी जळाल्याचे प्रकार वाढल्यामुळे पंधरा दिवस वीजच नसल्याचा कटू अनुभव शेतकरी वर्षभरात अनेकदा घेत होते. एरव्ही देखील पाच पाच तास वीज गायब राहण्याचे प्रकार तर बर्याच वेळा शेतकरी सहन करतात.

वरील गावांपैकी सर्वच गावांमध्ये कमीत कमी 3/4 डी पी नव्याने बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी बोलताना शेतकर्‍यांनी करताच, पाटील म्हणाले,’आकडे बंद करुन, थकीत वीज बील भरणा व्हायला हवा. त्यावेळी भिका सोनावणे यांनी थकीत भरणा केल्याची पावती दाखवताच पाटील यांनी समाधान व्यक्त केले. मध्यंतरी या परिस्थितील सर्व गावांमध्ये कार्यकारी उप अभियंता पाटील यांनी सर्व संबंधित इंजिनिअर, वायरमन आदी लव्याजम्यासह येऊन शेतकर्‍यांचे मेळावे घेतले होते. त्यावेळी थकीत वीज बील नियमितपणे भरावे वीज वितरण कंपनी तुम्ही म्हणाल त्या सुविधा द्यायला तयार असल्याचे जाहीर केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी साताळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा पुंजाराम काळे, माजी सरपंच मच्छिंद्र काळे, चेअरमन भाऊसाहेब कोकाटे, दिलीपराव काळे, भिकाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब जगताप, उपसरपंच गणेश कोकाटे, पी. के. काळे, सुखदेव काळे, कृष्णा कोकाटे, परशराम कोकाटे,संजय कोकाटे, दादाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब काळे, अमोल सोनावणे, ज्ञानेश्वर मोरे, बबनराव कोकाटे,संजय सोनावणे, राजेंद्र कोकाटे, नितीन कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, नारायण बारे,संदीप सोनावणे, साहेबराव कोकाटे आदी शेतकरी सहभागी होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com