दिवाळीच्या दिवशीच कृषिमंत्र्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

दिवाळीच्या दिवशीच कृषिमंत्र्याच्या घरासमोर  
शेतकऱ्यांचे आंदोलन

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

दिवाळीच्या दिवशीच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या घराच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari sanghtna) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी दादाजी भुसे यांनी आंदोलकांनी भेटत हात जोडून विनंती करत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले...(Agitation infront of agriculture minister dadaji bhuse's home malegaon)

गत वर्षाचा खरीप व फळबाग पिक विमा (Crop Insurance) त्वरित देण्यात यावा, अतिवृष्टीने शेतमालाची पूर्णतः हानी झाली असल्याने हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसह सक्तीने होत असलेल्या विज बिल वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर आंदोलन करीत निदर्शने केली.

यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी हात जोडून विनंती करत शासनाने पिक विमा संदर्भात काय भूमिका घेतली आहे तरी समजून घ्या असे सांगितल्यानंतर आंदोलनक चर्चेसाठी तयार झाले.

यावेळी भुसे यांनी पीक विम्या यासंदर्भात शासनाने घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली कंपन्यांनी पिक विमा अदा न केल्यास आपण स्वतः शेतकऱ्यांबरोबर आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले संघटनेच्या मागण्यांसंदर्भात शासनातर्फे निश्चितच सहानुभूती पूर्वक विचार केला जाईल अशी ग्वाही भुसे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कृषी मंत्री दादाजी भुसे आंदोलकांना सामोरे जात दोन तासापासून मी आपल्या समवेत चर्चेसाठी प्रतीक्षा करत आहे असे सांगत चर्चेसाठी घरात येण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी एक वर्षापासून आम्ही चार ते पाच वेळा या मागणीसाठी आंदोलने केली. मंत्रालयात आलो परंतु न्याय मिळालेला नाही आम्ही तुमच्या घरात येणार नाही. असा पवित्रा घेतल्याने कृषिमंत्र्यांनी तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे की स्टंटबाजी करायची आहे असे सांगितल्याने आंदोलक संतप्त झाले

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे गजानन पाटील सोमनाथ बोराळे रवींद्र इंगळे निवृत्ती झारे, सुधाकर मोगल आदिसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com