समृध्दी महामार्गाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

समृध्दी महामार्गाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

सिन्नर । Sinnar

तालुक्यातील दुशिंगपुरात (Dushingpur) समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Highway) अनागोंदी कारभाराविरुध्द परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmers) आमरण उपोषण (Agitation) सुरु केले...

महामार्गालगत शेतकऱ्यांच्या वाहनांची ये-जा करण्यासाठी 10 फूट लांबीचा सर्व्हीस रोड द्यावा, नादुरुस्त रस्ते वाहतूक योग्य करुन देण्याबरोबरच समृध्दीसाठी खोदलेल्या खाणींना तार कंपाऊंड करुन द्यावे या मागणीसाठी (Demand) वावी-सायाळे रस्त्यावरील दुशिंगपूर शिवारातील समृध्दीच्या पूलाखाली शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.

तहसील कार्यालयात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार राहुल कोताडे (Rahul Kotade) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिनाभराच्या आत नादुरुस्त रस्ते वाहतूक योग्य करुन देण्याबरोबरच समृध्दीसाठी खोदलेल्या खाणींना तार कंपाऊंड करून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यासाठी महिनाभराची मुदत मागून घेतली होती. मात्र, या मुदतीत एकही आश्वासन न पाळल्याने डॉ. विजय शिंदे (Dr. Vijay Shinde) यांच्यासह शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. समृध्दी महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांंच्या जमिनीचे तुकडे झाले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही.

समृध्दी महामार्गालगत भिंती टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतातून घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे समृध्दी महामार्गालगत 10 फूटी सर्व्हीस रोड देण्यात यावा या मागणीसाठी हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी डीबीएल कंपनीने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे.

उत्खनन केलेल्या खाणींना तार कंपाऊंड किंवा मार्गदर्शक सूचना फलक लावलेले नसल्याने अनेक अपघात (Accident) घडून त्यात निरपराध लोक बळी पडले आहेत. महामार्गासाठी आवश्यक असलेले माती, मुरुम आणि इतर साहित्य वाहून आणण्यासाठी कंपनीच्या अवजड वाहनांचा वापर करण्यात आला. त्यामुळे पूर्व भागातील संपूर्ण रस्त्यांची (Roads) चाळण झाली असून हे रस्ते वाहतुकीस अयोग्य बनले आहेत.

शिवाय शेतकऱ्यांचे शिवार रस्ते हे समृध्दी महामार्गामुळे बंद करण्यात आले असून परिसरातील दळणवळण त्यामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे विजय शिंदे, भास्कर कहांडळ यांच्यासह पूर्व भागातील काही शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनास पाठींबा देण्यासाठी दत्तात्रय कहांडळ, अंकुश पवार, दत्ता पवार, कचरु कहांडळ, भास्कर कहांडळ, कानिफनाथ काळे, नितीन अत्रे, रावसाहेब अत्रे, संपत काळे यांच्यासह सायाळे, मलढोण, दुशिंगूपर, कहांडळवाडी, फुलेनगर येथील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.