शहरात पावसाच्या हजेरीने बळीराजा धास्तावला

शहरात पावसाच्या हजेरीने बळीराजा धास्तावला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागिल आठवड्यात मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान (crop damage) केल्यानंतर अवकाळी पावसाने (Unseasonal rain) विश्रांती घेतली होती.

शेतकर्‍याचे (farmers) शेतीत साफसफाईचे काम सूरू असतानाच सोमवारी सायंकाळी पून्हा पावसाने (rain) हजेरी लावल्याने बळीराजा धास्तावल्याचे दिसून येत आहे. आठवडा भरापूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) 263 गावातील शेती उत्पादनांना मोठा फटका दिला होता.

जिल्ह्यातील 263 गावातील 5563 शेतक़र्‍यांना बसला आहे. त्यात 314 हेक्टर कांदा, 84 हेक्टर मका, 12 हेक्टर ज्वारी, 2419 हेक्टर गहु, साडेतीन हेक्टर टोमॅटेो, 94 हेक्टर हरभऱा, 201 हेक्टर भाजीपाला, 978 हेक्टेर द्राक्ष, 33 हेक्टर आंबा, एक हेक्टर डाळींब यांचे नुकसान झाले होते.

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारपासुन 15 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज असे हवामान तज्ज्ञ माणीकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी व्यक्त केला होता. सोमवारी दिवसभर निरभ्र असलेल्या आकाशत सायकाळी अचानक पाऊस आल्याने चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली.

तर बळीराजाची मात्र झोप उडाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान (crop damage) झाले त्यातून जे पिक वाचले त्यावरही पाणी फिरण्याची चिन्ह निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com