
नाशिक | Nashik
कांदा विक्रीतून (Onion Sale) उत्पादन खर्च, वाहतूक भाडे आणि ट्रॅक्टर भरण्यासाठी येणारा खर्च निघत नसल्याने नैताळे येथील शेतकऱ्याने (Farmer) काढणीस आलेल्या दोन एकर कांद्यावर रोटर फिरवून कांदा मातीत मिसळून देत राज्य सरकारचा निषेध केला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील रतन बोरगुडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये दोन एकरवर लाल रांगडा कांद्याची लागवड (Cultivation) केली होती. त्यासाठी त्यांनी सव्वा लाखाच्या आसपास खर्च करून चांगल्या पद्धतीचा कांदा तयार केला होता. परंतु, आता काढणीस आलेल्या कांद्यास ४०० चे ५०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन (Product) खर्चासह मजुरी निघणे कठीण झाल्याने बोरगुडे यांनी दोन एकरवर रोटर फिरवला.
दरम्यान, एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातबाजी करत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असे म्हणत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शासनाने निर्यात त्वरित कायमस्वरूपी खुली करून निर्यातीसाठी आर्थिक प्रोत्साहन देऊन नियम व अटी शिथिल करत कांदा निर्यातीबाबत वर्षभराचे धोरण ठरवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.