
ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) सरसाळे येथील शेतकऱ्याच्या भावाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे....
सविस्तर वृत्त असे की, दिगंबर उत्तम गांगोडे (24, व्यवसाय शेती) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार माझा भाऊ शनिवारी (दि. 14) सहा वाजेच्या दरम्यान पुंडलिक उत्तम गांगोडे (30, सरसाळे, ता. दिंडोरी जि. नाशिक) यांनी आपल्या राहत्या घरी आडगईच्या लोखंडी एँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला.
त्यांना वणी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून पुंडलिक उत्तम गांगोडे यांना मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम शेलार करीत आहे.