जिल्ह्यातील शेतकऱ्याने २१ कांद्यांवर मोदींचे चित्र काढत नोंदवला निषेध

जिल्ह्यातील शेतकऱ्याने २१ कांद्यांवर मोदींचे चित्र काढत नोंदवला निषेध

नाशिक | Nashik

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्याने कांदा घरात साठवून ठेवला आहे. बाजारात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी नेत नाहीत. या कांद्याच्या भावाची दखल केंद्र सरकारने (Central Government) घ्यावी यासाठी सटाणा (Satana) येथील एका कलाकार शेतकऱ्याने तब्बल २१ कांद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे...

किरण मोरे (Kiran More) असे या कलाकार शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी जवळपास १० ते १२ दिवसांत हे चित्र साकारले आहे. मोरे यांनी शेतकरी आंदोलनाचे नेते शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या वाढदिवसानिमित्त कांद्यांवर हे चित्र रेखाटले होते. त्यातील २१ कांद्यांवर पंतप्रधान मोदी व एका कांद्यावर शरद जोशी यांचे चित्र काढले. या कांद्यांवरील चित्राच्या माध्यमातून शेतकऱ्याने रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याचा संदेश दिला आहे.

तसेच कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आजही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. पंरतु,सरकारला अजूनही जाग येत नसल्याने शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या अनोख्या चित्रकलेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे लक्ष्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे वेधण्यासाठी मोरे यांनी हा प्रयत्न केल्याचे दिसते.

अनेक महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे मी कांद्यांवर पंतप्रधान मोदींचे चित्र काढण्याचा वेगळा प्रयोग करत खासदार सुभाष भामरे यांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधानापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. निदान यापुढे तरी कांदा विषयी धोरणात बदल होऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

किरण मोरे, कलाकार, शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com