बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; परिसरात दहशतीचे वातावरण

सटाणा । प्रतिनिधी | Satana

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) वटार येथील सावतावाडी वस्तीलगत असलेल्या पानंद रस्त्यावर रस्त्याने जात असलेल्या शेतकर्‍यावर (farmer) झाडात लपलेल्या बिबट्याने (leopard) झडप मारून रस्त्यावर खाली पाडत जखमी केले.

पाठीमागून येणार्‍या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने घाबरलेल्या बिबट्याने (leopard) पळ शेतकर्‍याचे प्राण बचावले. राजेंद्र बागुल हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी (injured) झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. बागुल रात्री 8 वाजेच्या सुमारास पानंद रस्त्याने जात असतांना बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप मारल्याने ते खाली पडले.

सुदैवाने बागुल यांच्या पाठीमागून येत असलेल्या अशोक बागुल यांनी जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने (leopard) तेथून पळ काढल्याने राजेंद्र बागुल यांचे वाचले. पलायन केलेल्या बिबट्याने रात्री पुन्हा शेतामध्ये पाणी देत असलेल्या दर्शन देत दहशत निर्माण केली.

सावतावाडी परिसरात गत अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे. अनेकांवर त्याने हल्ले चढवित गंभीररित्या जखमी केल्याच्या घटना गत काही महिन्यात घडल्या आहेत. नागरीकांवर हल्ले करणार्‍या या बिबट्याने परिसरातील 20 ते 25 प्राण्यांचा देखील पाडला आहे. राजेंद्र बागुल यांच्यावर देखील पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या याच बिबट्याने हल्ला (Leopard attack) चढविल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

खरीप (kharif) व रब्बी हंगामाची (rabbi season) कामे शेतात सुरू आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना रात्रीच वीज राहत असल्याने जावे लागते. अशातच रात्रीतून बिबट्याचा परिसरात सुरू असलेला मुक्त वावर व तो चढवत हल्ल्यांमुळे शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मेंढपाळ तर रात्रीच्या सुमारास फटाके फोडून आपल्या कळपाचे रक्षण करीत आहेत.

सावतावाडी परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह ग्रामस्थांतर्फे सातत्याने केली जात आहे. मात्र या मागणीकडे वनविभाग अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी बागुल यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे वटार परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरा लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांतर्फे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com