देवळा
देवळा
नाशिक

देवळा : दुचाकी अपघातात फुलेनगर येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

वासोळ | Wasol

सौंदणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात फुलेंनगर (वासोळ पाडे, ता. देवळा) येथील प्रतिष्ठित शेतकरी आणि वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळू महादू खैरनार यांचे निधन झाले.

खैरनार दुपारी साडेतीन वाजता उमराणेंकडून दुचाकीवर फुलेंनगर कडे येत असतांना धोबीघाट येथे दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे दाखल केले होते, परंतु अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

फुलेंनगरच्या सरपंच रंजना खैरनार यांचे ते पती होते. अधिक तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदशनाखाली पोलीस हवालदार अशोक फसाळे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com