शेतकऱ्याचा संताप; टोमॅटो ओतले रस्त्यावर

म्हाळसाकोरे | वार्ताहर | Mhalsakore

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) चापडगाव येथील शेतकऱ्याच्या (Farmer) टोमॅटोला नाशिक बाजार समितीमध्ये अवघा दीड रुपये किलो दर मिळाल्याने त्या शेतकऱ्याने टोमॅटो (Tomato) रस्त्यावर ओतून संताप व्यक्त केला आहे...

शेतकऱ्याचा संताप; टोमॅटो ओतले रस्त्यावर
देवळालीगाव कोयता हल्ल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, चापडगाव (Chapdgaon) येथील शेतकरी विकास त्र्यंबक दराडे यांनी गुरुवारी (दि.४) रोजी नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik APMC) पिकअपद्वारे १२० कॅरेटमधून टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. या टोमॅटोला प्रतिकॅरेट ३५ रुपये दर मिळाला. त्या दराने किलोमागे केवळ १.७५ पैसे दराडेंना मिळाले.

त्यामुळे आलेल्या रकमेतून वाहतूक खर्चही फिटणार नसल्याने दराडे यांनी बाजार समिती आवारातच टोमॅटो रस्त्यावर ओतून संताप व्यक्त केला. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या शेतमालास उत्पादन खर्चा इतकाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संपूर्ण कॅरेटमधील टोमॅटो बाजार समितीच्या आवारात रस्त्याच्याकडेला ओतून दिले.

शेतकऱ्याचा संताप; टोमॅटो ओतले रस्त्यावर
Photo Gallery : शालिमार परिसरातील दुकाने मनपाकडून जमीनदोस्त

दरम्यान, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येस (Suicide) परवानगी मिळावी, अशी मागणी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांकडे केली. तर खते, मल्चिंग पेपर, बांबू, तार, फवारणी, लिक्विड, खत, पहिली-दुसरी बांधणी, मजूर यावर देखील दराडेंचा मोठा खर्च झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com