काठीपाडा येथे शेतकऱ्याचा ट्रक्टरखाली दबून मृत्यू

भात आवणीच्या कामादरम्यान घडली घटना
काठीपाडा येथे शेतकऱ्याचा ट्रक्टरखाली दबून मृत्यू
सुरगाणा

सुरगाणा | Surgana

तालुक्यातील काठीपाडा येथे भात लागवड करीता चिखलणी करुन घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. ही घटना दुपारी (दि.२९) साडेचार वाजेच्या सुमारास घडली

दरम्यान सध्या तालुक्यात भात आवणीची कामे सुरू असून लागवडीसाठी चिखल करून घरी परतत असताना ट्रॅक्टर उलटला. यामध्ये चालक शेतकरी ट्रॅक्टर खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यास काढण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यास वाचवता आले नाही. वेळेवर एखादी क्रेन उपलब्ध झाली असती तर शेतकऱ्याचा प्राण वाचला असता असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com