नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पाचोरे वणी (Pachore Vani) येथील एका शेतकऱ्याचा तळ्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की जगदीश भास्कर वाटपाडे (वय वर्ष ३४) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. वाटपाडे हे आपल्या शेततळ्यात मोटरचा पाईप ना दुरुस्त असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी गेले असता तळ्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

यानंतर घटनेची माहिती तात्काळ पिंपळगाव पोलिसांना (Pimpalgaon Police) कळविण्यात आली. तसेच पिंपळगाव येथील एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी जगदीश वाटपाडे यांना पिंपळगाव येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी बाराहाते करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com