रवळजी : कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
रवळजी : कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक

रवळजी : कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पुनदखोरे l Punadkhore (वार्ताहर)

लॉकडाऊन काळात कष्टाने पिकविलेल्या कांदा पिकाला योग्य भाव व हाताला काम न मिळाल्याने तालुक्यातील रवळजी येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी प्रकाश शिवाजी निकम (३८).

याने रवळजी शिवारातील धाकल दरी भागातील स्वतःच्या शेतात आज (दि. १६) ऑगस्ट रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मयत  प्रकाश निकम हे अल्पभूधारक शेतकरी असून उपजीविका भागविण्यासाठी शेती व्यतिरिक्त मिळेल ते काम करत असत. नातेवाईकांच्या सांगणेवरून निकम यांनी लॉकडाऊन काळात पिकविलेल्या कांदा पिकाला योग्य दर मिळाला नाही व लॉकडाऊन काळात हाताला कामही मिळाले नाही. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.

तसेच त्यांनी महाराष्ट्र बँकेचे पीककर्ज तसेच खाजगी फायनांन्स कंपनीचे कर्ज घेतले असल्याचे समजते. त्यांनी आज सकाळी रवळजी शिवारातील धाकल दरी भागातील स्वतःच्या शेतात आज सकाळी १o वाजेच्या सुमारास सागाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

मयत प्रकाश निकम यांचे कळवण उपजील्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पो. नि. प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. कडाळे करीत आहे .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com