सरकारी बेपर्वाईमुळे शेतकर्‍याची आत्महत्या: निकम

सरकारी बेपर्वाईमुळे शेतकर्‍याची आत्महत्या: निकम
देशदूत न्यूज अपडेट

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

ग्रामीण महाराष्ट्राच्या (maharashtra) समस्यांविषयी पूर्णपणे अज्ञानी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या बेपर्वाईमुळेच राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या गाळपाची समस्या गंभीर बनली असून बीडमधील (Beed) शेतकर्‍याने (farmer) ऐन उमेदीत गळफास (noose) घेऊन केलेली आत्महत्या (Suicide) हे ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेचे पाप आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम (BJP district president Suresh Nikam) यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

ऊस उत्पादन असेच वाढत राहिले तर शेतकर्‍यांवर (farmers) आत्महत्येची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्रातच (maharashtra) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी अलीकडेच दिला होता. ना. गडकरी यांच्या इशार्‍याकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहून ऊस गाळपाचे काटेकोर नियोजन करायला हवे. मराठवाड्यातील शिल्लक ऊसाचा अंदाज घेऊन त्याच्या तोडणीचे नियोजन करायला हवे होते. मात्र क्षुल्लक कारणावरून काही नेत्यांना छळण्यासाठी सूडबुद्धीचे राजकारण (politics) करण्यात रमलेल्या ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

या बेपर्वाईमुळेच अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून राज्यातील सुमारे 70 लाख टन ऊस (Cane) गाळपाविना शेतात करपून जात आहे. गाळप न झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 75 हजार रुपये देण्याच्या भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ठाकरे सरकार शेतकर्‍याच्या हलाखीची गंमत पहात राहिले. अलीकडेच भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. परंतू ठाकरे सरकारपर्यंत शेतकर्‍याचा आक्रोश पोहोचलाच नाही.

गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे 500 हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या (Suicide) करूनही ठाकरे सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. मुंबई केंद्रीत माध्यमांनी आता बातम्यांचे प्राधान्यक्रम बदलून ग्रामीण महाराष्ट्राचा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही निकम यांनी केले आहे. शेतकर्‍यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर आता ग्रामीण भागातील शेतकरी मुंबईवर चाल करून आपल्या समस्या मंत्रालयासमोर मांडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

वेळेत तोडणी होऊन कारखान्याने ऊस उचलला नाही म्हणून शेतात करपणार्‍या उसाला आग लावून नामदेव जाधव नामक 32 वर्षांच्या शेतकर्‍याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकारच्या निष्क्रीय कारकिर्दीचा हा बळी असून शेतकर्‍यावरील अन्यायाचा विक्रम नोंदवून ठाकरे सरकारने आपल्या असंवेदनशील कारभाराचे दर्शन घडविले आहे. ऐन उमेदीत शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निकम यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.